शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घृष्णेश्वर मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटी द्या; १५६ कोटींतून मंदिराबाहेरील परिसराचा विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:46 IST

२०१८ मध्ये ११२ कोटींचा प्रस्ताव होता. २०२४ मध्ये तो १५६ कोटींवर गेला. २०२५ मध्ये ४५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी सात वर्षांपासून सुरू आहे. घोषणांचा ‘अभिषेक’ करणाऱ्या आराखड्यातील कामांची पूर्तता सात वर्षांत झाली नाही.

वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी १५६ कोटी ६३ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर असून मंदिराच्या आत सुधारणेसाठी ८० कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मंदिराच्या आतील परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची संयुक्त परवानगी घेऊन आतील सभामंडपाचे काम केले जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

कुंभमेळ्यापूर्वी १५६ कोटींच्या आराखड्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी १० ऑगस्ट रोजी उच्च तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी सर्व यंत्रणांना ३१ मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

ज्योतिर्लिंगाची झीजज्योतिर्लिंगाची झीज होत आहे. त्यामुळे मंदिर समितीने बाह्यदर्शनाचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्यास तेथे काय उपाययोजना करता येतील, याबाबत सर्वानुमते विचार केला जाईल, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. गाभाऱ्यात दर्शनाबाबत काही नियम आहेत. त्यामुळे भाविकांचीही तारांबळ उडते. त्यामुळे बाह्यदर्शन अथवा इतर काही व्यवस्था करण्याबाबत समितीने प्रस्ताव दिला तर प्रशासन विचार करेल, असे ते म्हणाले.

७ वर्षांत किती काम?२०१८ मध्ये ११२ कोटींचा प्रस्ताव होता. २०२४ मध्ये तो १५६ कोटींवर गेला. २०२५ मध्ये ४५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. चार वर्षांत अतिक्रमणे काढण्याचे काम झाले. मागील दोन २ वर्षांत दगड, माती, चुन्यातील काम झाले आहे. भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दर्शनबारी हॉल, बहुउद्देशीय सभागृहापैकी भक्तनिवासाचे काम ७० टक्के झाले आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सचे १० टक्के, दर्शनबारी व हॉलचे काम २० टक्के झाले असून शॉपिंग कॉम्प्लेक्सचे स्टाइल, डोमचे काम सुरू आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण