शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लहू जाधवचा आणखी तिघांना ४५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:22 IST

व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या लहू जाधवचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तब्बल ६१ लाख ७५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या लहू जाधवने अन्य तीन जणांची ४५ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या लहू जाधवचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तब्बल ६१ लाख ७५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या लहू जाधवने अन्य तीन जणांची ४५ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी दुसरा गुन्हा शुक्रवारी सिडको पोलिसांनी नोंदविला. या गुन्ह्यात जाधवसोबत अन्य तीन जणांचा समावेश आहे.लहू उत्तम जाधव, (रा. त्रिमूर्तीनगर, बीड बायपास परिसर), मनीषा विक्रम राजपूत (रा. राजीव गांधीनगर, मुकुंदवाडी), विक्रम हरिश्चंद्र राजपूत (रा. राजीव गांधीनगर), भरत उत्तम जाधव (रा. त्रिमूर्तीनगर), अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. विक्रम राजपूत हा आरटीओ कार्यालयात लिपिक आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, व्यवसायातील नफ्यात भागीदारी देण्याच्या नावाखाली आरोपी लहू जाधवने संजय मुथियान यांना ६१ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्याला १६ जुलै रोजी गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपी लहू जाधवला पोलिसांनी अटक केल्याचे कळताच मयूरपार्क परिसरातील रहिवासी अर्जुन किशनराव साळुंके, संतोष तायडे आणि अन्य एकाने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली. लहू जाधव आणि त्याच्या साथीदाराने एस.एन. क न्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार बनविण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी १५ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपये जमा केले. १६ एप्रिल २०१५ साली आरोपींनी ही रक्कम घेतली. त्यानंतर कंपनी तोट्यात आल्याचे सांगून आरोपींनी तक्रारदारांचे पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर पैसे मागितले, तर कारखाली चिरडून ठार मारीन, अशी धमक ीही त्यांनी दिली.याबाबतच्या तक्रारी गुन्हे शाखेला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी याप्रकरणी आणखी एक स्वतंत्र गुन्हा लहू जाधव आणि अन्य आरोपींविरोधात नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस