शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

भगांर विक्रेत्यांचा सरकारला २०० कोटीं गंडा; केंद्रीय जीएसटी विभागाची औरंगाबादेत धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 12:50 IST

आयटीसी घोटाळ्यात दिल्लीतील व्यापाऱ्याला १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद : प्रत्यक्षात भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारपेक्षा अधिक बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी)द्वारे सरकारला सुमारे २०० कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याला १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता या घोटाळ्यात सहभागी झालेल्या वाळूज, हनुमाननगर येथील एका भंगार दुकानावर सायंकाळी धाड टाकण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील समीर मलिक याने शहरात नारेगाव येथे सनसाईज इंटरप्राईजेस नावाने फर्म सुरु केली होती. त्यासाठी त्याने बोगस नोंदणी केली होती. त्याने ६० कोटींचे बोगस बिल फाडले होते. १० कोटींची आयटीसी शहरातील १५ ते १६ भंगार विक्रेत्यांना फॉरवर्ड केली होती. या व्यवहाराचा संशय येथील केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना आल्यानंतर त्यांनी समीर मलिक याला औरंगाबादेत बोलावले व विमानतळावर शुक्रवारी ४ तारखेला अटक केली होती. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

आता ज्या भंगार विक्रेत्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेत सरकारी तिजोरीवर डल्ला मारला व आपली तिजोरी भरुन घेतली, असे सरकारची फसवणूक करणारे शहरातील विविध भागातील १७पेक्षा अधिक भंगार विक्रेते या कटात सहभागी असल्याचे आढळल्यावर केंद्रीय जीएसटी विभागाने धाडसत्र सुरू केले. बुधवारी पहिली धाड वाळूजमधील हनुमान नगरातील भंगार दुकानावर टाकण्यात आली. केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त मनोज कुमार रजक, अतिरिक्त आयुक्त एस. बी. देशमुख, उपायुक्त चंद्रकांत केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी नारिया प्रवीणकुमार हे पुढील तपास करत आहेत.

राज्य - परराज्यात ५० फर्मबनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा करणारा आरोपी समीर मलिक याने राज्य - परराज्यात ५०पेक्षा अधिक फर्म तयार केले आहेत. त्याद्वारे भंगार खरेदी-विक्री दाखवून बोगस बिले फाडली व आयटीसीचा लाभ घेत सरकारला कोट्यवधींना फसवले. या प्रकरणाची व्याप्ती औरंगाबाद, दिल्ली, हैदराबादसह अन्य राज्यांत आहे. आता या घोटाळ्याचे धागेदोरे शोधण्यात केंद्रीय जीएसटी विभाग व्यग्र आहे.

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी