शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

१२५ कोटींच्या निविदेत कंत्राटदारांची जीएसटीच्या नावावर खाबूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:20 IST

कंत्राटदारांनी सर्व कामे १५ ते १९ टक्के अधिक दराने निविदा भरल्या आहेत.

ठळक मुद्दे वाढीव दराची कंत्राटदारांनी दिलेली उत्तरे अत्यंत हास्यास्पद आहेत. जीएसटीसह सर्व कामे एका कंत्राटदाराने चक्क अंदाजपत्रकीय दरापेक्षा ६ टक्के कमी दराने भरले होते

औरंगाबाद : शहरातील रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने १२५ कोटींच्या निविदा प्रसिद्ध केल्या. कंत्राटदारांनी सर्व कामे १५ ते १९ टक्के अधिक दराने निविदा भरल्या आहेत. एवढ्या वाढीव दराची कारणे मनपा प्रशासनाने मागितली होती. त्यावर कंत्राटदारांनी दिलेली उत्तरे अत्यंत हास्यास्पद आहेत. जीएसटी १२ टक्केद्यावा लागेल, रात्री काम करावे लागेल, सिमेंटचे दर वाढले, डिझेल दरात वाढ झाली, अशी कारणे देण्यात आली आहेत. सहा महिन्यांपूर्वी जीएसटीसह सर्व कामे एका कंत्राटदाराने चक्क अंदाजपत्रकीय दरापेक्षा ६ टक्के कमी दराने भरले होते, हे विशेष.

१२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे म्हणजे महापालिकेतील राजकीय मंडळी, कंत्राटदार, अधिकाºयांसाठी जॅकपॉट ठरले आहे. मागील एक वर्षापासून या कामात विघ्ने येत आहेत. कधी कंत्राटदारांचे भांडण, तर कधी राजकीय वर्चस्वाची लढाई रंगलेली असते. या कामांमध्ये शासनाचे १०० कोटी रुपये आहेत. महापालिकेच्या तिजोरीतील २५ कोटी रुपये जातील, असे सांगण्यात आले आहे. आता निविदा अंतिम करण्याची वेळ आली तेव्हा कंत्राटदरांनी निविदा १५ ते १९ टक्के अधिक दराने भरल्या आहेत.

ही वाढीव रक्कम तर मनपाच्या तिजोरीतूनच द्यावी लागणार आहे. या वाढीव रकमेसाठी शासन आणखी विशेष अनुदान तर देणार नाही. मागील आठवड्यात मनपा प्रशासनाने पाच कंत्राटदारांना नोटीस बजावली की, वाढीव दराची कारणे द्या. कोणत्या कामांसाठी किती खर्च येणार याचा सविस्तर तपशील द्या, अशी मागणीही मनपाने केली. कंत्राटदारांनीही गुरुवारी आपले उत्तर प्रशासनाला सादर केले. १२५ कोटींच्या कामात १२ टक्केरक्कम तर जीएसटीची द्यावी लागेल. डिझेलचे दर वाढले आहेत. शहरात ही कामे करावी लागणार असल्याने रात्री काम करावे लागेल. त्यासाठी मजुरीचा खर्च वाढणार आहे. सिमेंट आणि खडीचे रेट वाढले आहेत.

२४ कोटी मनपाच्या तिजोरीतूनकंत्राटदारांसोबत मनपा प्रशासनाने वाटाघाडी केल्यानंतरही किमान २२ ते २४ कोटी रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी मनपानेच निविदा काढल्या होत्या. तेव्हा यातीलच एका कंत्राटदाराने ६ टक्केकमी दराने सर्व निविदा भरून कामही मिळविले होते. तेव्हासुद्धा जीएसटी, डिझेलचे वाढीव दर, रात्री काम करावे लागणार होते.

२४ कोटींमध्येच होणार वाटप१२५ कोटींच्या कामांमध्ये उघडपणे रिंग झालेली आहे. कोणत्या कंत्राटदराने किती दराने निविदा भरायाच्या हे एका राजकीय रिमोट कंट्रोलने ठरविले आहे. अंदाजपत्रकीय दरापेक्षा जेवढी वाढीव रक्कम होईल, तेवढी रक्कम रिमोट कंट्रोलच्या हाती जाईल. त्यानंतर आपसात ही रक्कम वाटप होणार आहे. वाटप रक्कम किमान २४ कोटींच्या घरात राहील, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा