शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

रोझ गार्डन चौथ्या दिवशीच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 6:32 PM

मोफत प्रवेश महानगरपालिकेच्या अंगलट

ठळक मुद्दे४ दिवसांमध्ये पाच हजारांवर नागरिकांनी दिली भेट ३ एकर परिसरात १३ वेगवेगळ्या स्वरूपाची झाडे

औरंगाबाद : केंद्रीय पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून मजनू हिल येथील टेकडीवर रोझ गार्डन उभारण्यात आले आहे. तेरा प्रकारच्या वेगवेगळ्या गुलाबांच्या झाडांनी हे उद्यान विकसित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनापासून नागरिकांसाठी उद्यान मोफत स्वरूपात खुले करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी १७७४ नागरिकांनी भेट दिली. उद्यानात उनाड तरुणांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली असून, कुटुंबासह उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले होते. अखेर आज चौथ्या दिवशी मनपाने उद्यानाला कुलूप लावले.

पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटकांना शहरात ऐतिहासिक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी बरेच काही आहे. सायंकाळी निवांत क्षण घालविण्यासाठी एक सुंदर नेत्रदीपक असे रोझ गार्डनही असावे, अशी संकल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली. महापालिकेने केंद्रीय पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठविला. केंद्र शासनाने तब्बल ३ कोटी रुपयांचे अनुदानही दिले. या अनुदानातून ३ एकर जागेवर गुलाबांच्या १४ पाकळ्यांमध्ये एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आले. उद्यानात सोफिया, ग्लॅडर, समरस्नो, स्कें टिमेंटा, क्रिसमिया, क्लासिक अ‍ॅक्ट, शॉकिंगब्ल्यू, अलिंका, अशा १३ वेगवेगळ्या स्वरूपाची झाडे लावण्यात आली आहेत.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेऊन १५ आॅगस्टपासून उद्यान काही दिवस मोफत स्वरूपात सुरू करावे, असा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून गुलाब पुष्पप्रेमींनी अलोट गर्दी केली. १७७४ जणांनी दिवसभरात उद्यानाला भेट दिली.चार दिवसांमध्ये पाच हजारांहून अधिक नागरिकांनी उद्यानाला भेट दिली. उद्यानात मोफत प्रवेश असल्याने गोळ्यांची नशा करणारे तरुण, गांजा ओढणारे, दारुडेही बिनधास्त आत शिरत आहेत. सुरक्षारक्षकांनाही न जुमानणारे तरुण मोठ्या संख्येने फिरत असून, उद्यानात आलेल्या नागरिकांना शिवीगाळही करीत असल्याच्या तक्रारी बऱ्याच वाढत होत्या.

खाजगी एजन्सी, तिकीट आवश्यककोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रोझ गार्डनची देखभाल करणे मनपाला शक्य नाही. या क्षेत्रातील एखादी खाजगी एजन्सी नेमण्याचा विचार मनपाने यापूर्वीच व्यक्त केला आहे. एजन्सीने प्रवेश शुल्क लावून त्या उत्पन्नातून उद्यानाची देखभाल करावी, असाही निर्णय झाला. सध्या आचारसंहिता असल्याने मनपाने एजन्सी न नेमताच उद्यान खुले केले. त्यामुळे हा निर्णय लवकरच अंगलट येऊ शकतो.

अखेर उद्यानाला लावले कुलूप रोझ गार्डनमध्ये दारुडे, गोळ्यांची नशा करणारे तरुण मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत होते. रविवारी चौथ्या दिवशी उनाड तरुणांचा रोष लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने उद्यानाला कुलूप लावणे पसंत केले. खाजगी एजन्सी नियुक्त करून आता उद्यान उघडले जाईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन