शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

९५ हजार भुकेलेल्यांना अन्न पोहोचविणारी युवकांची ‘रॉबिनहुड आर्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:57 IST

समारंभातील शिल्लक अन्न पोहोचवितात भुकेलेल्यांपर्यंत

ठळक मुद्देसध्या देशातील १३० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. २० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम 

- राम शिनगारे 

औरंगाबाद : १६ सप्टेंबर २०१८ पासून रॉबिनहुड आर्मी नावाने एकत्र आलेल्या शहरातील ३७० युवकांनी नऊ महिन्यांमध्ये ९५ हजारांहून अधिक भुकेलेल्यांना अन्नाचा घास भरविला आहे.  विविध लग्नकार्य, समारंभात शिल्लक राहिलेले अन्न भुकेलेल्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य शहरातील सीए, डॉक्टर, विधिज्ञांसह महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले युवक करीत आहेत.

दिल्ली येथे नील घोष नावाच्या युवकाने २०१६ मध्ये शहरातील विविध कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहणाऱ्या अन्नाचे वाटप करण्यासाठी २०१६ मध्ये रॉबिनहुड आर्मीची स्थापना केली. सध्या देशातील १३० पेक्षा अधिक शहरांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. औरंगाबाद शहरातही रोहित इंगळे, अजिंक्य पूर्णपात्रे, नुरेन नहरी, माधवी सोनी आणि डॉ. लुबना सिद्दी यांनी एकत्र येऊन हा सामाजिक उपक्रम १६ सप्टेंबर २०१८ पासून सुरू केला. आतापर्यंत या उपक्रमात ३७० युवक जोडले गेले आहेत. हिरव्या रंगाचे टी शर्ट परिधान करून शहरातील कोणत्याही भागात कार्यक्रमाच्या स्थळी अन्न शिल्लक राहिले असल्याची माहिती समजताच या ग्रुपमधील युवक त्याठिकाणी पोहोचतात. अन्न खराब झालेले नसेल तर तात्काळ ताब्यात घेऊन रेल्वेस्थानक, घाटी परिसर, राहुलनगर, धूत हॉस्पिटलसमोर गोरगरीब भागात जाऊन वाटप करतात. या उपक्रमाला लग्नसराईत अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे रोहित इंगळे, सुचित शेटे यांनी सांगितले. नऊ महिन्यांत ९५ हजारांहून अधिक लोकांना शिल्लक राहिलेल्या अन्नातून पोटभर खाऊ घातले असल्याचेही इंगळे यांनी स्पष्ट केले. 

या उपक्रमासाठी कोणताही खर्च येत नाही. शिल्लक राहिलेले अन्न असते. ते आॅटोरिक्षा किंवा कोणाच्याही चारचाकी वाहनातून भुकेल्यांपर्यंत घेऊन जावे लागते. त्याठिकाणी अन्नाचे वाटप होताच युवक स्वत:च्या कामाला निघून जातात. त्यामुळे फक्त श्रम, मेहनत आणि वेळच द्यावा लागतो. हिरव्या रंगाचे टी शर्ट घातलेले युवक रेल्वेस्टेशन किंवा भुकेल्या वस्तीच्या परिसरात दिसताच अन्न घेण्यासाठी गर्दी होते. त्याच वेळी शहरातील स्वयंपाक करणाऱ्या केटरर्संनाही माहिती झाली आहे. त्यामुळे तेही अन्न शिल्लक राहिल्यास संपर्क साधून माहिती देतात, असेही रोहित इंगळे हे सांगत होते. या उपक्रमात सुचित शेटे, गौरव मेश्राम, शुभम चक्रे, नंदकुमार फुटाणे, शुभम पाटीदार, आकाश जाधव, शेखर देशपांडे, श्रुती पाटील, निधी श्रीसुंदर, वेदांत जैस्वाल आदी युवक सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

२० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम भुकेलेल्यांपर्यंत अन्न पोहोचविणाऱ्या रॉबिनहुड आर्मीच्या युवकांना आतापर्यंत ९ महिन्यांत २० पेक्षा अधिक सामाजिक उपक्रमही घेतले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त या युवकांनी शहराच्या विविध भागांतून तुटलेल्या, फुटलेल्या १७ सायकली गोळा केल्या. या सायकली दुरुस्तीनंतर नारेगाव येथील महापालिकेच्या शाळेतील १७ विद्यार्थ्यांना त्या वाटप केल्या. यात दहा सायकली मुलांना तर ७ सायकली मुलींना दिल्या असल्याचे सुचित शेटे यांनी सांगितले. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हाच आमच्या सामाजिक उपक्रमाचे यश असल्याचेही हे युवक सांगतात.

टॅग्स :social workerसमाजसेवकSocialसामाजिकfoodअन्नAurangabadऔरंगाबाद