शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

खुलताबादेत एकाच रात्री तीन घरे फोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:29 IST

भद्रा कॉलनीत गेल्या वर्षभरापासून चोरट्यांचा धुमाकुळ 

खुलताबादेत एकाच रात्री तीन घरे फोडली खुलताबाद (औरंगाबाद ) :  येथील भद्रा कॉलनीत शुक्रवारी (दि.२)  चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरात चोरी करुन दागदागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षभरात भद्रा कॉलनीत आठ ते दहा घरात चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री संजय बन्सी करपे , दत्ता प्रकाश खुंटाळे, साखराबाई बारगळ यांची घरे चोरांनी फोडली. तिन्ही घरातील रहिवासी भद्रा मारूती मंदीर परिसरात विविध धार्मिक साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. श्रावण महिन्याचा पहिला शनिवार असल्याने ते शुक्रवारी रात्री मंदिर परिसरात गेले होते. चोरांनी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान तिन्ही घरे फोडण्यात आली. संजय करपे यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असा 50 ते 60 हजाराचा ऐवज, दत्ता प्रकाश खुंटाळे यांचा ४ हजार रोख व 20 हजाराचे दागिने तर साखराबाई बारगळ यांची दागिने आणि रोख 20 हजार रूपये चोरून चोरट्यांनी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक चंदन इमले यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरिक्षक भगवान झरेकर, पोहेकॉ यतीन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रा कॉलनीत दहशत भद्रा मारूती मंदीराच्या परिसरात असलेल्या भद्रा कॉलनीत गेल्या वर्षभरापासून चो-यांचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत लहानमोठ्या जवळपास दहा घरात चोरीच्या घटना झाल्या आहेत. वर्षभरापूर्वी मिलींद गोसावी यांच्या घरात मोठी चोरी झाली होती जवळपास तीन ते चार लाख रूपयाचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर जयराज नागे यांच्या घरातून जवऴपास दीड लाख रूपयांचा  ऐवज चोरीला गेला होता. श्रीकांत कुलकर्णी, राजेंद्र दांडेकर, रवी भागवत, पुसे  यांच्या घरी चोरी झाली होती. या चोरींच्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नाही. यातच पुन्हा तीन घरांमध्ये चोरी झाली.  

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद