शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेला गेलेल्या कुटुंबियांचे घर फोडून पळविला किमती ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:40 IST

चोरट्यांनी बंगल्याच्या छतावरील दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.

औरंगाबाद : अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चांदीची भांडी, चांदीचा रथ, महागडी घड्याळ, असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना ३० मे ते २ जूनदरम्यान दशमेशनगर येथे घडली. 

याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरातील दशमेशनगर येथील विवेकानंद दत्तात्रय भोसले (६५) हे ३० मे रोजी सकाळी ११ वाजता कुटुंबियांसह मुलांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते. घर सांभाळण्यासाठी त्यांनी दोन दिवस आणि रात्रपाळीकरिता दोन सुरक्षारक्षक नेमले होते. एवढेच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेरेही लावलेले आहेत. घराची सफाई करण्यासाठी त्यांनी एका महिलेला नियुक्त केले आहे. ३० मे रोजी कामवालीबाई घराची स्वच्छता करून गेली. नंतर तिसऱ्या दिवशी २ जून रोजी ती महिला पुन्हा स्वच्छता करण्यासाठी भोसले यांच्या बंगल्यात गेली तेव्हा त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे दिसले. या घटनेची माहिती महिलेने सुरक्षारक्षकाला दिली.

दशमेशनगर परिसरातच भोसले यांचे लहान भाऊ राहतात. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान चार दिवसांपूर्वी भोसले हे अमेरिकेतून औरंगाबादला परतले. त्यांनी केलेल्या पाहणीत चोरट्यांनी बंगल्याच्या छतावरील दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. यानंतर बेडरूमचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचे चांदीचे चार ताट, चांदीचे चार ग्लास, चांदीच्या चार वाट्या, चांदीची अत्तरदाणी, चांदीचा कुंकवाचा करंडा, १५ हजार रुपये किमतीचा रथ, २० हजार रुपये किमतीचे घड्याळ असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याविषयी विवेकानंद भोसले यांनी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके तपास करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी