शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरमधील वरखेड शिवारात दरोडा; शेतकरी कुटुंबाला मारहाण करून लाखोंचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:30 IST

दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबास मारहाण करून गंभीर जखमी केले, बाप-लेक गंभीर जखमी

गंगापूर: तालुक्यातील वरखेड शिवारात चोरट्यांनी औटे वस्तीवर सोमवारी (३) पहाटेच्या सुमारास दरोडा टाकला. यात दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबास मारहाण करून गंभीर जखमी केले. या दरोड्यात भामट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा सव्वा लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला.

वरखेड शिवारात गट क्रमांक २१३ मध्ये अशोक भानुदास औटे(वय ५५) हे कुटुंबासह वास्तव्यास असून सोमवारी(३) पहाटे ३:३० वाजता चार दरोडेखोरांनी त्यांच्या वस्तीवरील घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व अशोक औटे त्यांचा मुलगा,गणेश अशोक औटे(४०) सून सोनाली गणेश औटे(३५) नातू रुद्रा गणेश औटे(१४) यांना जबर मारहाण करून जखमी केले तसेच शस्त्राचा धाक दाखवून घरातील सोने,चांदी व रोख रक्कम असा सव्वा लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला. 

बाप-लेक गंभीर जखमीयावेळी चोरट्यांनी दरोड्यानंतर औटे कुटुंबाचे मोबाईल हिसकावून शेतात लांब फेकून दिले तसेच त्यांच्या शेतवस्तीवर लावलेल्या सुमारे अर्धा एकर टरबूजाची देखील नासाडी केली. अशोक औटे यांनी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाजूच्या शेतवस्तीवर जाऊन फोनद्वारे नातेवाईकांना घटनेबद्दल माहिती दिली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत औटे कुटुंबातील अशोक व गणेश हे बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येऊन त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोनि सलीम चाऊस यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी पाहणी केली. दरोडेखोरांनी याच रात्री औटे वस्तीच्या बाजूला असलेल्या जंगले वस्तीवरील बंद घराचे कुलूप देखील तोडले. मात्र या वस्तीवर कोणीच राहत नसल्याने त्यांच्या हाताला काहीच लागले नाही

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर