शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाण्यातील रस्ते महानगरपालिकेच्या ठरावाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:39 IST

या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे हा ठराव मिळाल्यानंतरच रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.  

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी परिसरात आजघडीला खड्डेमय रस्त्यांमुळे माल वाहतूक करताना अनेकदा आर्थिक नुकसान होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या रस्त्यांची कामे करण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयारी दर्शविली आहे; परंतु त्यासाठी महापालिकेचा ठराव मिळण्याची प्रतीक्षा आहे. हा ठराव मिळाल्यानंतरच रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.  

चिकलठाणा एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचा प्रश्न बिकट बनला आहे. गेल्या ४० वर्षांपासून या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून महसूल घेऊनही रस्ते दुरुस्त केलेले नाहीत. सर्व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे उद्योजक, कामगार, सर्वसामान्य नागरिकांसह माल वाहतुकीसाठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

सध्या कार्यरत असलेले उद्योजक त्रस्त असून, या औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक विकास खुंटत असल्याची भावना उद्योजकांतून व्यक्त होत आहे. जळगाव आणि अमरावती येथे महापालिका असून, तेथील औद्योगिक क्षेत्रातील रस्ते बांधणी, दुरुस्ती व देखभाल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करीत आहे. त्याच धर्तीवर चिकलठाणा एमआयडीसीतील रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधून द्यावेत,अशी मागणी उद्योजकांनी केली. येथील उद्योगांची खराब रस्त्यांच्या त्रासातून सुटका करण्यासाठी लवकरात लवकर क ाम करण्याची मागणी ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी यांनी केली आहे.

महानगरपालिकेला घ्यावा लागणार ठराव२७ मार्च आणि १४ मे रोजी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये चिकलठाणा येथील रस्ते एमआयडीसीने बांधून देण्याचे तत्त्वत: मान्य करण्यात आले. त्यासाठी महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच मनपाने एमआयडीसीला पत्र दिले; परंतु रस्त्यांच्या कामासाठी आता मनपाचा ठराव आवश्यक आहे. ठरावासंदर्भात महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे म्हणाले.  

टॅग्स :chikhalthanaचिखलठाणाhighwayमहामार्गAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका