औरंगाबाद : शहराच्या दिशेने वेगाने येणाऱ्या जीपने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. धडकेनंतर चालकाने दुचाकीला तब्बल दोनशे फूट फरपटत नेले. यात दोघे जागीच ठार झाले. हा भीषण अपघात पडेगाव रोडवरील गारवा हॉटेलजवळ मंगळवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडला.मृत्यूचा सापळा समजल्या जाणाºया पडेगाव रोडवर मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शंकर किसन खरात (२७, रा. पिंप्रीराजा), संजू दगडू सावळे (३५, रा. पिंप्रीराजा, ता. औरंगाबाद) या दोघांचा मृत्यू झाला. परिसरातील खरात व त्याचा मित्र सावळे दुचाकीने (एमएच-२०-डी.एम-६३९२) औरंगाबादहून दौलताबादच्या दिशेने जात होते. खुलताबादहून भरधाव येणाºया जीपने (एमएच-२०-सी.एच-४२८२) गारवा हॉटेलजवळ दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात दोघे दूरवर फेकले गेले व गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. दुचाकी जीपमध्ये अडकली. अपघातानंतर चालकाने दुचाकी तब्बल दोनशे फुटांपर्यंत फरपटत नेली.नागरिकांनी केला पाठलागअपघाताच्या घटनेनंतर चालकाने जीप घटनास्थळी न थांबविता वेगाने पळविली. पडेगाव येथील काही नागरिकांनी पाठलाग करून जीपला हॉटेल ग्रिनलँडजवळ अडविले. माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी घाटीत दाखल केले. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
भरधाव जीपच्या धडकेत मोटारसायकलस्वार दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:00 IST
शहराच्या दिशेने वेगाने येणाऱ्या जीपने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. धडकेनंतर चालकाने दुचाकीला तब्बल दोनशे फूट फरपटत नेले. यात दोघे जागीच ठार झाले.
भरधाव जीपच्या धडकेत मोटारसायकलस्वार दोघे ठार
ठळक मुद्देदोनशे फूट फरपटत नेली दुचाकी : मृत्यूचा सापळा औरंगाबादेतील पडेगाव रोडवर अपघात