शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

लॉकडाऊनमुळे रिक्षाचे हप्ते थकले, फायनान्स कंपनीच्या धमक्याने चालकाने उचले टोकाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 14:46 IST

वसुली पथकाच्या धमक्यामुळे कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या

ठळक मुद्दे पत्नीची मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार फायनान्स कंपनीच्या चार जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : ऑटो रिक्षाचे थकलेले हप्ते भरण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली टीमच्या सततच्या धमक्यांना कंटाळून घाबरलेला रिक्षाचालक संतोष पावशे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असून, फायनान्स कंपनीच्या ४ जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.

खासगी फायनान्सचे शेख इमरान शेख अब्दुल माजिद (रा. दादा कॉलनी), जावेद साबेर कुरेशी (रा. सिल्लेखाना औरंगाबाद), अंकुश रामराव कांबळे (रा. चिकलठाणा), ॲड. अनंत एस. लऊळकर (रा. एरंडवणे, पुणे) आणि फायनान्सचे इतर कर्मचारी अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना काळात लॉकडाऊनने सर्वच थांबले. त्यात रिक्षाचा धंदाही संपला. त्यामुळे कर्जाचे हप्ते थांबले. त्यातच पावशे यांनी रिक्षाही विक्री केली. रिक्षाचे थकलेले हप्ते भरण्यासाठी आरोपींनी पावशे यांना धमकावणे सुरू केले होते. या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कमल संतोष पावशे (२७. रा. रामनगर, एन-२ सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. ३ मे ते दि.२५ सप्टेंबर २०२१ या काळात उपरोक्त आरोपी वसुलीसाठी सतत फोन करून धमक्या देत होते.

ठाण्यासमोर जमाव..वसुलीसाठी सतत अपशब्द वापरून अपमानित करणे, जीवे मारण्याची धमकी देणे यामुळेच पतीने आत्महत्या केली. यास कारणीभूत आरोपीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी अतुल घडामोडे, सुभाष पाटील, सुनील सूर्यवंशी, बापू घडामोडे, सुभाष शुक्ला, मोहन साळवे यांच्यासह मोठा जमाव रविवारी सकाळी मुकुंदवाडी ठाण्यासमोर जमा झाला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीनातेवाइकांनी लावून धरली होती, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणण्याचा इशाराही दिला होता. पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी गुन्हा दाखल केल्यावर जमाव निघून गेला. उपनिरीक्षक वैशाली गुळवे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या