शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हातावर ‘जय शिवराय’ असे लिहून रिक्षा चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 18:46 IST

वाळूज परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका भागवीत असे.

ठळक मुद्देविटावा येथे राहत्या घरी घेतला गळफास

वाळूज महानगर : हाताच्या पंजावर ‘जय शिवराय’, मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास विटावा गावात उघडकीस आली. प्रल्हाद बळीराम पोळ (५२), असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव असून, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

प्रल्हाद पोळ (रा. बनचिंचोली, ता. हदगाव, जि. नांदेड) पत्नी लता व मुलगा यांच्या सोबत विटावा येथे रामभाऊ गव्हाणे यांच्या घरात किरायाने राहत होते. वाळूज परिसरात रिक्षा चालवून ते कुटुंबाची उपजीविका भागवीत. महिनाभरापूर्वी त्यांचे वडील बळीराम पोळ यांचे निधन झाल्याने पत्नी लता पोळ ही मुलासह मूळ गावी गेलेली आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास प्रल्हाद पोळ हे राहत्या घरी पंख्याला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच बालाजी सूर्यवंशी व लक्ष्मण डोळस यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने प्रल्हाद यांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांना सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रल्हाद यांस मयत घोषित केले.

हाताच्या पंजावर मजकूर लिहून संपविले जीवनपत्नी व मुलगा गावी गेलेले असल्याने प्रल्हाद महिनाभरापासून घरी एकटेच होते. आत्महत्या करण्यापूर्वी प्रल्हाद यांनी हाताच्या पंजावर पेनाने ‘जय शिवराय’ मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहिला असून, अशोक दामले या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. योगेश कासरले करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद