शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लय भारी ! सौर ऊर्जेमुळे वीज बिलांमधून सुटका; शिल्लक विजेतून उत्पन्नही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 19:05 IST

केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्तसाहाय्य देण्यात येत आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : शहरात अडीच हजार घरांच्या छतावर सौर ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती केली जात आहे. वीज बिलाची तर बचत होतेच, शिवाय या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून शिल्लक वीज महावितरणकडून विकत घेतली जात आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना वेग देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्तसाहाय्य देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.महावितरणकडून लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षाअखेर सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून शिल्लक वीज महावितरणकडून विकत घेतली जात आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधित घरगुती ग्राहकांना होत आहे. महावितरणने रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडळनिहाय एजन्सींची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शहरातील सौर ऊर्जा वापरणारे ग्राहक-लघुदाब : २,७०४ : १८ हजार ५०९ किलोवॅट क्षमता- उच्चदाब : ६८ : १६ हजार ८७३ किलोवॅट क्षमता

सौर ऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढतेशहरात सौर ऊर्जेचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. जागेची पाहणी करून योग्यता पाहून त्यासाठी परवानगी दिली जाते. सौर ऊर्जा ही ग्रीन एनर्जी असून नागरिकांनी त्याचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी योजनाही आहेत.- सतीश खाकसे, कार्यकारी अभियंता, शहर मंडळ, महावितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज