शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

'झटपट कारवाई, पटापट शिक्षा' पॅटर्नला पुरस्कार; उत्पादन शुल्कचे संतोष झगडे बेस्ट सुप्रीडेंट

By राम शिनगारे | Updated: May 2, 2023 15:15 IST

राज्य उत्नादन शुल्क विभागाचा बेस्ट सुप्रीडेंट पुरस्कार संतोष झगडे यांना जाहीर

छत्रपती संभाजीनगर : अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर हटके कारवाई करीत तात्काळ शिक्षा देण्याचा धडकाचा राज्य उत्नादन शुल्क विभागाने लावला. 'झटपट कारवाई, पटापट शिक्षा'च्या या पॅटर्नमुळे राज्य उत्नादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी जाहीर केलेल्या 'बेस्ट सुप्रीडेंट ऑफ द इयर' पुरस्कारासाठी अधीक्षक संतोष झगडे यांची निवड केली. हा पुरस्कार २०२२-२३ या वर्षातील कामगिरीसाठी जाहीर केला आहे.

छत्रपती संभाजीनगर उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षपदाचा पदभार २५ मे २०२२ रोजी संतोष झगडे यांनी घेतला. पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्याभरात अवैध ढाब्यांवर दारू विक्रीच्या विरोधात मोहीमच उघडली. त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल ५४५ ढाब्यांवर कारवाई केली. त्यामध्ये ५९७ आरोपींवर गुन्हे नोंदवले. त्यातील २८९ आरोपींना सत्र न्यायालयांनी दंडात्मक शिक्षा ठोठावली. या शिक्षेची रक्कम तब्बल १४ लाख रुपये एवढी आहे. या कारवायांमुळे परवानाधारकांचे उत्नादन वाढले. त्याशिवाय अवैध दारू विक्री ऐवजी शासनाकडे परवाना मागणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातुन शासनाला कोट्यावधी रुपयांचा महसुल प्राप्त झाला आहे. राज्य उत्नादन शुल्क विभागाच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात झगडे यांच्या नेतृत्वात हातभट्टी, बनावट मद्य, ताडी, अवैध ढाब्यांवर दारू विक्री आणि परराज्यातुन येणारी विदेशी मद्याच्या विरोधात तब्बल १२२४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

गांजा विक्रेत्यांवर उगारला बडगाउत्नादन शुल्क विभाग केवळ अवैध दारू विक्रीच्या विरोधातील कारवाईपुरता मर्यादीत नसून, अंमली पदार्थाच्या विरोधातही कारवाई करू शकतो हे झगडे यांनी दाखवून दिले. त्यांनी चार कारवायांमध्ये ७९ लाख ४ हजार ३०५ रुपयांचा गांजा जप्त केला. या कारवाया थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी केल्या आहेत.

मक्कोकानंतर पहिल्यांदा एमपीडीएअधीक्षक झगडे यांनी पुण्यात कार्यरत असताना अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात मकोका कायद्यानुसार कारवाई केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी कुख्यात अवैध दारू विक्रेता कृष्णा पोटदुखे आणि भाऊलाल जऱ्हाडे या दोघांना एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध केले. राज्यात पहिल्यांदाच उत्नादन शुल्क विभागाने एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून मंजुर करून घेतला होता.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी