शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महसूलचा वाळूमाफियांना दणका; दंड न भरणाऱ्या मुजोरांच्या सातबाऱ्यावर सहा कोटींचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 12:36 IST

वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार

गंगापूर ( औरंगाबाद ) : गौण खजिन्यावर डोळा ठेवून महसूल यंत्रणेला न जुमानता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना तहसील प्रशासनाने दणका दिला आहे. वाळूज मंडळातील वाळूमाफियांना सहा कोटींचा दंड ठोठावून त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढविण्यात आला आहे. वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी ही मोहीम तीव्र करणार असून, वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर शेंदूरवादा व लासूर परिसरातील अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना प्रशासन कशा प्रकारे पायबंद घालणार हा पण एक प्रश्न आहे.

गौणखनिज माफियांवर अनेकदा कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु, ते प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता पुन्हा नव्या जोमाने अवैध वाळू उपसा करत असल्याची स्थिती आहे. अशाच मुजोर व प्रशासनाला कोणतीही दाद न देणाऱ्या वाळूज मंडळातील कासोडा, तळेसमान, आसेगाव, नांदेडा व मुस्तफाबाद शिवारातून सत्तावीस वाळू चोरांनी एकूण २ हजार ब्रास वाळूचा अवैध उपसा केला आहे. अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना बाजार मूल्यापेक्षा पाचपट अधिक दंड आकारण्यात येतो. त्याआधारे तहसीलदार सोनी यांनी या वाळू चोरांना जोरदार दणका दिला असून सत्तावीस जणांच्या सातबाऱ्यावर एकूण ६ कोटी ९ लाख ७४ हजार ४४८ रुपयांचा बोजा चढवला आहे. लाखोंचा दंड आकारल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. याचप्रमाणे शेंदूरवादा व लासूर परिसरात रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाळू वाहतुकीलासुद्धा तहसीलदारांनी वेसण घालावी, अशी मागणी होत आहे.

यांना ठोठावला दंडपोपट काळे, जालिंदर कर्डीले, सय्यद इनाम, रावसाहेब माने, रंगनाथ शेळके, मीना शेळके, विश्वनाथ देवबोने, भाऊसाहेब चाने (कासोडा), देविदास शेळके, नारायण कांबळे, शेख जफर बाबा, शेख सुलतान बाबा, शेख इब्राहीम बाबा, हसीना शेख सय्यद गणी, नंदू जाधव, कारभारी जाधव, लक्ष्मण जाधव, प्रभाकर जाधव, प्रभाकर कुलकर्णी (तळेसमान), सय्यद गणी, शेख जहूर ममेमुद कासम, बाळू जाधव, बाळू बल्लाळ (आसेगाव), अर्जून मते, ज्ञानेश्वर भांगरे, (नांदेडा), मुरलीधर थोरात (मुस्तफाबाद) यांचा समावेश आहे.

मालमत्तेचा लिलाव करूवाळूमाफियांना दंड वसुलीसाठी तातडीने रीतसर नोटीस पाठवणार आहे. संबंधितांनी दंड भरला नाही तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल.- सतीश सोनी, तहसीलदार, गंगापूर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी