शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नोंदींची दुरुस्ती रखडल्याने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्यांची शक्यता धूसर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 12:58 IST

जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे.

ठळक मुद्देगेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्या बदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही दरवर्षी साधारणपणे मे अखेरपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत असतात.यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांच्याबदलीबाबत राज्यस्तरीय आॅनलाइन बदल्यांच्या विभागाकडून कोणतीही सूचना प्राप्त नसल्यामुळे शिक्षणाधिका-यांसह जिल्हा परिषदेच्याशिक्षकांमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे. तथापि, जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे. 

दरवर्षी साधारणपणे मे अखेरपर्यंत शिक्षकांच्या बदल्या होत असतात. यंदा ग्रामविकास विभागाने जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावरूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय विभाग स्थापन करण्यात आला. या विभागाने यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय नोंदी मागविल्या. जूनपासून संपूर्ण आॅक्टोबरपर्यंत शिक्षकांकडून आॅनलाइन नोंदणी करून घेतली. यासंदर्भात राज्यस्तरीय बदली विभागाकडून वारंवार तब्बल ११२३ सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदलीपात्र यादीतील शिक्षकांपैकी मयत झालेले किंवा बदलीपात्र नसतानादेखील चुकीने काही शिक्षकांचा बदलीपात्र यादीत समावेश करण्यात आला आहे काय, याची जिल्हानिहाय खातरजमा करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत राज्यस्तरीय बदली विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 

तथापि, राज्यस्तरीय बदली विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, संवर्ग-१मध्ये काही शिक्षकांनी गंभीर आजारी नसतानादेखील वैद्यकीय अधिका-यांकडून आजाराचे खोटे प्रमाणपत्र मिळवून ते आॅनलाइन नोंदणीच्या वेळी जोडले आहे. याशिवाय अनेकांनी पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा उचलण्यासाठी ३० किलोमीटरच्या आतमध्ये असलेल्या शाळांवर कार्यरत शिक्षकांनीही आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. अशा शिक्षकांची तालुकानिहाय सखोल तपासणी केल्यानंतर खोट्या नोंदी करणाºया शिक्षकांना यादीतून वगळले जाईल. त्यानंतरच बदलींचे आदेश निर्गमित केले जाणार आहेत. परंतु राज्यस्तरीय बदली विभागाकडून अजूनपर्यंत तालुकानिहाय याद्यांच्या तपासणीचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले नाहीत.

शिक्षकांमध्ये दोन गट सक्रियशिक्षकांमध्ये आता बदलीच्या बाजूने व विरोधी, असे दोन दबाव गट सक्रिय झाले आहेत. या दोन्ही गटांनी संपूर्ण राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी शक्तिप्रदर्शनही केले. सर्वोच्च न्यायालयानेदेखील २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हिरवा कंदिल दाखविला. पहिल्यापासून आक्रमक असलेला राज्यस्तरीय बदली विभाग मात्र, अंतिम टप्प्यात शांत दिसत आहे. चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होतील, की मे २०१८ अखेर बदल्यांबाबत निर्णय घेतला जाईल, यासंबंधीच्या सूचनांकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.