शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

लगीनघाईला पुन्हा सुरुवात; डिसेंबरमध्ये बांधल्या जातील १५०० रेशीमगाठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:28 IST

नवीन आदेशाप्रमाणे तुम्हाला २०० ऐवजी आता ५० लोकांच्याच साक्षीने लग्न करावे लागेल.

ठळक मुद्देकोरोना वाढत असतानाही उडणार बारमंगल कार्यालये घेताहेत काळजी

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : ‘हॅलो, मी मंगल कार्यालयातून बोलतोय.. तुम्ही  मुलीच्या लग्नासाठी आमच्या मंगल कार्यालयात बुकिंग केली. नवीन आदेशाप्रमाणे तुम्हाला २०० ऐवजी आता ५० लोकांच्याच साक्षीने मुलीचे लग्न करावे लागेल. तुम्ही पुढील नियोजन करा, हे सांगण्यासाठी फोन केला,’ असा फोन आज अनेक  मंगल कार्यालयांतून वधू-वराच्या घरी जात आहे. हा निरोप ऐकून, कोणाल यादीतून वगळायचे, असा यक्षप्रश्न  पडला आहे. 

कालपर्यंत मंगल कार्यालयातील क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांना लग्न सोहळ्यात परवानगी देण्यात येणार, असे सांगितले जात होते; पण मंगळवारी महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पडळकर यांनी  मंगल कार्यालय मालकांची बैठक घेऊन त्यांना वरील आदेश दिला आहे. मंगल कार्यालय, लॉन्स संघटनेतर्फे सांगण्यात आले की, शहरात मंगल कार्यालय व लॉन्सची संख्या १५० आहे. प्रत्येक कार्यालयातील नोव्हेंबर व डिसेंबरमधील १० तारखा बुक झाल्या आहेत. म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत शहरात १,५०० लग्नसोहळे पार पडणार आहेत. 

मंगल कार्यालये घेताहेत काळजीप्रशासनाने आदेशानुसार मंगल कार्यालयात ५० जणांना परवानगी देण्यात येणार आहे. वय वर्षे १० ते ६५ वर्षाच्या वऱ्हाडींना प्रवेश दिला जाईल.  मंगल कार्यालय फवारणी, वऱ्हाडींना सॅनिटायझर , थर्मलगनने तपासणी होईल. 

ऐन लग्नसराईच्या तोंडावर लग्नात फक्त ५० जणांना परवानगी असणार आहे, असा प्रशासनाने आदेश दिला आहे. वधू व वर पित्यांनी धावपळ उडाली आहे. २०० जणांना पत्रिका दिली त्यातील १५० जणांना लग्नाला येऊ नका कसे म्हणायचे, असा प्रश्न पडला आहे. तसेच   मंगल कार्यालय मालकांचे व केटरिंग व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.- सुमीत कुलकर्णी, मंगल कार्यालय मालक

आधी मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांना प्रवेश देणार अशा बातम्या आल्या होत्या. त्यानुसार  मंगल कार्यालय चालकांनी तयारी केली होती. मात्र, आता फक्त ५० लोकांना परवानगी दिल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. २०० ते ३०० लोकांना परवानगी देण्यात यावी, अशी आमची मागणी    आहे. - प्रशांत शेळके, अध्यक्ष, मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशन

जानेवारी, मे महिन्यांत जास्त लग्नतिथी महिना           लग्नतिथीनोव्हेंबर     २७,३० डिसेंबर     ७,८,९,१७,१९,२३,२४,२७.जानेवारी     ३,५,६,७,८,९,१०,१८,१९,२०,२१. २४,२५,३०.फेब्रुवारी    १,२,३,४,८,२१,२२,२६,२७,२८.मार्च     २,३,५,७,९,१०,१५,१६,३०.एप्रिल    २२,२४,२५,२६,२८,२९,३०.मे     १,२,३,४,५,८,१३,२०,२१,२२,२४,२६, २८,३०,३१. जून    ४,६,१६,१९,२०,२७,२८.जुलै    १,२,३,१३.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका