शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटिंगवर निर्बंध; परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे लावण्यासही मनाईच

By सुमित डोळे | Updated: March 29, 2024 17:40 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांचे आदेश जाहीर, १० जूनपर्यंत राहणार लागू

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस विभागाने देखील जय्यत तयारी केली असून कायदा सुव्यवस्थेसह विविध पातळींवर मार्गदर्शक संहिता जारी केली आहे. त्यात प्रामुख्याने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटिंगवर निर्बंध घालण्यात आले असून परवानगीशिवाय वाहनांवर झेंडेदेखील लावण्यास मनाई असेल. १० जूनपर्यंत हे आदेश लागू असतील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाकडून १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घाेषणा करण्यात आली. त्यानंतर मागील दहा दिवसांपासून पोलिस आयुक्तालयात आयुक्त मनोल लोहिया यांच्या नेतृत्वात बैठकांचे सत्र सुरू आहे. उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या बैठकीत सातत्याने सुरक्षा व तयारींचा आढावा घेतला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बीएसएफची एक तुकडी शहरात दाखल झाली असून एसआरपीएफसह बाहेरूनही पोलिसांचा मोठा फौजफाटा लवकरच शहरात दाखल होणार आहे. पोलिस अधिनियमान्वये पोलिस आयुक्त लोहिया यांनी नुकतेच मनाई आदेश जारी केले.

आदेशानुसार: -निवडणूक प्रचारासाठी व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भिंतीचा वापर परवानगीशिवाय करता येणार नाही.-सकाळी ६ वाजेपूर्वी व रात्री १० वाजेनंतर कोणत्याही वाहनाद्वारे ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. त्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक.-पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटिंग, होर्डिंग, कमानी, घोषवाक्य लिहिण्यावर निर्बंध.-प्रचारादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विश्रामगृहे, पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस आयुक्त परिमंडळ कार्यालयांच्या इमारत, आवार व परिसरात करता येणार नाही.-उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन दाखल करताना कार्यालय परिसरात मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजवण्यावर निर्बंध, तसेच कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तीनपेक्षा जादा वाहने आणता येणार नाहीत.-निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, आंदोलनास मनाई.- परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे, बॅनर लावण्यास निर्बंध.

रात्री कडेकोट तपासणीनिवडणुकीत अनुचित प्रकार, कुठलीही अवैध तस्करी टाळण्यासाठी पोलिसांचे लक्ष राहणार आहे. रात्रीदेखील नेहमीपेक्षा अधिक गांभीर्याने गस्त घालून आवश्यक वेळी नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४