शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

विकतचे टँकर अन् जारच्या पाण्यावर जगताहेत पडेगाव, माजी सैनिक कॉलनी, मीरानगरवासीय

By साहेबराव हिवराळे | Updated: March 13, 2024 18:32 IST

एक दिवस एक वसाहत: घरे बांधली टोलेजंग, रस्तेही गुळगुळीत; पण जवळपास दवाखाना नसल्याने गाठावे लागते शहर

छत्रपती संभाजीनगर : पडेगाव, माजी सैनिक कॉलनी, मीरानगरवासीय बाराही महिने टँकर आणि जार पाण्यावर कसेबसे जगत आहेत. महानगरपालिकेने बांधलेल्या जलकुंभात अधूनमधून अत्यल्प पाणी भरले जाते. पण वाढत्या लोकसंख्येला हे पाणी कमी पडतेय. यामुळे पिण्यासाठी जारचे पाणीच विकत घ्यावे लागते. सकाळी मुलांना शाळेत नेऊन सोडताना जपून जावे लागते. दवाखाना नसल्याने शहरात उपचारासाठी जावे लागते. कचरा सफाईकडेही कर्मचारी कानाडोळा करतात. त्यांना कुणाचा धाक नसल्याने अस्वच्छता पसरते. सिमेंटीकरणाने रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहतुकीचा वेग वाढला व अपघातापासून बचाव करण्यासाठी अतिदक्षता बाळगावी लागते. कारण येेथे गतिरोधकच नाहीत. या समस्या सोडविण्यासाठी मनपाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

१५ हातपंप नादुरुस्तपाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून लोकप्रतिनिधींच्या निधीमधून बोअरवेल घेण्यात आल्या आहेत. सुमारे १५ बोअरवेल तुटलेल्या असून, मनपाकडे स्वतंत्र विभाग असतानाही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. किमान उन्हाळ्यात तरी हे बोअरवेल दुरुस्त केल्यास नागरिकांची भटकंती टळेल.- मिलिंद शेजूळ, नागरिक

गतिरोधक किंवा स्काय वॉक हवापडेगाव व आजूूबाजूच्या वसाहतीत जाताना हायवेवरून जाताना अत्यंत दक्षता बाळगावी लागते; कारण रस्त्यावर किरकोळ अपघात सातत्याने घडतात. काहींना मोठ्या वाहनाचा धक्का लागल्यास जीवही गमवावा लागतो. येथे वाहनाची गती रोखण्यासाठी गतिरोधक किंवा स्काय वॉक ब्रिज बनवावा, अशी नागरिक व पालकांची मागणी आहे.- शेख लतीफ (नागरिक)

पाहुणे आले की पंचाईतचनवीन योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, त्यात पाणीच आलेले नाही. सध्या तरी टँकर आणि जारच्या पाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागत आहे. चार पाहुणे आले की, मोठी पंचाईत होते. पाणीपुरवठा लवकर करावा.-संतोष धनतोले, रहिवासी

सार्वजनिक स्वच्छतागृह मोडकळीससार्वजनिक स्वच्छतागृहाची मनपाने दुरुस्ती केलेली नसल्याने त्याचा वापर करणे शक्य नाही. येथे सफाई व पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.-बाळू शिंदे, रहिवासी

महिलांसाठी उपक्रम राबवावेत...बचत गटाच्या महिलांना कौशल्य व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांंना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कामगार कुटुंबे या परिसरात मोठ्या प्रमाणात राहतात.-डाॅ. रंजना शेजवळ, रहिवासी

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका