शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची संजय निंबाळकरांवर शाईफेक; विद्यापीठाच्या विभाजनास केला विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:57 IST

विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीला आंबडेकरी संघटनांचा विरोध

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीचा वाद आता पेटला आहे. स्वतंत्र विद्यापीठाची मागणी लावून धरणारे व्यवस्थापन सदस्य संजय निंबळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत शाईफेक करत विद्यापीठ विभाजनास विरोध दर्शवला.  

उस्मानाबाद उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापिठात रुपांतर करावे अशी मागणी मागील काही काळापासून पुढे आली आहे. माजी कुलगुरू बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात व्यवस्थापन सदस्य संजय निंबाळकर यांनी हा ठराव मांडला. त्यानंतर सभेत ठराव पास होऊन पुढील कारवाईसाठी  राज्यपालांकडे गेला आहे. मात्र, आंबेडकरी संघटनांनी यास विरोध करत विद्यापीठाचे विभाजन म्हणजे नामांतर लढ्यातील बलिदानाचा अवमान ठरेल अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, विद्यापीठ विभाजन करून उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सातत्याने लावून धरणारे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबळकर आज विद्यापीठात सभेच्या निमित्ताने आले होते. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी बैठकीस आलेल्या संजय निंबळकर यांना जाब विचारत विभाजनास विरोध दर्शवला. यानंतर निकम यांनी अचानक निंबळकर यांच्यावर शाईफेक केली. विद्यापीठ सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून निकम यांना ताब्यात घेतले. यावेळी वेळी गुणरत्न सोनवणे, पवन  पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे आदींनी विद्यापीठ विभाजनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

नामांतर बलिदानाचा अवमान ठरेलविद्यापीठाचे विभाजन करून नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान करण्याचा हा प्रयत्न आहे. यातून राज्यात दंगली पेटविण्याचे कारस्थान आहे. विद्यापीठ विभाजनास आमचा तीव्र विरोध असेल. - सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी सेना

जुनी मागणी आहे विद्यापीठाचे विभाजन करणे हे शासनाचे काम आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता मी माझे काम यापुढेही करत राहील. या प्रकरणाची तक्रार विद्यापीठ करेल. - संजय निंबळकर, सदस्य, व्यवस्थापन परिषद 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद