यावेळी जि. प. सदस्या सीमाताई गव्हाणे, प्रशासक डी. आर. सपकाळ ग्रामविकास अधिकारी किशोर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल धनवट, महाराष्ट्र ग्रामीण बॕँकेचे शाखा व्यवस्थापक प्रशांत फुसे, राहुल शिंदे, रोखपाल राजू तडवी, कर्मचारी देवीदास निकम, पशुवैद्यकीय अधिकारी आशिष साळवे, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक के. जी. सपकाळ व शिक्षकवृंद, वडेश्वर विद्यामंदिरचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गोंगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुस्तफा शहा व शिक्षकवृंद, जिल्हा बँकेचे भारतअप्पा लवंगे, राजू पाटील, पो. पा. दगडू मैंद आदींची उपस्थिती होती.
चौकट
तरुणांचा सत्कार
प्रजासत्ताकदिनी अंभई येथील तरुण अंकुश पुंडलिक दांडगे यांची सैन्यदलात निवड झाल्याबद्दल व वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळविल्याबद्दल अजय पांडुरंग मरसाळे यांचा ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.