वडगावच्या सरपंचासह ग्रामसेवक व सदस्यांवर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 08:50 PM2018-12-17T20:50:53+5:302018-12-17T20:51:10+5:30

गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी अहवालात सरपंच उषा साळे, ग्रामसेवक विलास कचकुरे यांच्यासह सदस्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

 Representatives of Gramsevak and members of Wadgaon with Sarpanch | वडगावच्या सरपंचासह ग्रामसेवक व सदस्यांवर ठपका

वडगावच्या सरपंचासह ग्रामसेवक व सदस्यांवर ठपका

googlenewsNext

वाळूज महानगर : सिडको अधिगृहित क्षेत्रातील भूखंडाच्या नोंदी घेणे वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीला चांगलेच महागात पडले आहे. गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी अहवालात सरपंच उषा साळे, ग्रामसेवक विलास कचकुरे यांच्यासह सदस्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.


वाळूज महानगरातील सिडक ो अधिसूचित क्षेत्रात येणाऱ्या जमिनीवर काही जणांनी ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांना हाताशी धरुन ले आऊट पाडून अनधिकृतपणे भूखंडाची खरेदी-विक्री केली. हा प्रकार लक्षात येताच सिडको प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतीला नोटिसा बजावल्या होत्या. याप्रकरणी पंढरपूरचे जि.प. सदस्य रमेश गायकवाड व वडगाव कोल्हाटी येथील योगेश साळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकाºयांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरुन गटविकास अधिकारी राठोड यांनी चौकशी समिती नेमली होती. समितीने चौकशी करुन अहवाल तयार केला. अहवालात सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांवर ठपका ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


पाच महिन्यांत ५७५ नोंदी
ग्रामसेवक विलास कचकुरे व सरपंच उषा साळे यांनी ५ महिन्यांच्या कालावधीत सिडको अधिसूचित क्षेत्रात पूर्व परवानगी न घेता तब्बल ५७५ प्लॉटिंग व फेरफारच्या नोंदी नमुना नं. ८ वर घेवून अनियमितता केली असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे.

Web Title:  Representatives of Gramsevak and members of Wadgaon with Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.