शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगाराला रिक्षा भाड्याने देणे भोवले; प्रवाशाच्या खून प्रकरणी चालकानंतर मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:11 IST

चालकाकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन, मद्यपान करून रिक्षा चालवल्यास, लुटमार, मारहाणीचे कृत्य झाल्यास रिक्षामालकही तेवढेच जबाबदार धरून कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आलेल्या २८ वर्षीय जयराम बबन पिंपळे (रा. श्रीरामपूर) याची रिक्षाचालक मुजम्मिल रफीक कुरेशी (२२) याने क्रूर हत्या केली. गुन्हेगाराला कुठलीही शहानिशा न करता भाड्याने रिक्षा देऊन गुन्ह्यास अप्रत्यक्ष जबाबदार धरल्याचा ठपका ठेवत रिक्षामालक सय्यद मझरोद्दीन सय्यद अलीमोद्दीन (रा. राहुलनगर) याला छावणी पोलिसांनी अटक केल्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले. चालकास आधीच अटक झालेली आहे.

४ जूनला पहाटे वाळूजला जाण्यासाठी जयराम रिक्षात बसले होते. मात्र, पैशांवरून वाद झाल्याच्या किरकोळ कारणावरून मुजम्मिलने जयरामवर चाकूहल्ला केला. उपचारादरम्यान जयराम यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रिक्षा व्यवसायातील वाढते गुन्हेगारांचे प्रमाण, शस्त्र बाळगून प्रवाशांच्या वाहतुकीसह प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला.

मुजम्मिलवर कल्याण रेल्वे स्थानक पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. तो सतत चाकू बाळगून, नशेतच रिक्षा चालवत होता. विशेष म्हणजे, त्याच्याकडे वाहन परवानाही नव्हता. हल्ल्यानंतर मुजम्मिल जयराम यांचा मोबाइलही घेऊन गेला. त्यामुळे त्याची गुन्हेगारी वृत्ती निष्पन्न झाली. भाड्याने रिक्षा देताना मालक कुठलीही शहानिशा न करता कोणालाही रिक्षा देतात. परिणामी, गुन्हेगारांचे या व्यवसायात प्रमाण वाढले. ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेद्वारे समोर आणल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अशा बेजबाबदार मालकांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.

शनिवारी सहायक निरीक्षक विवेक जाधव यांच्या सूचनेवरुन उपनिरीक्षक संजय रोकडे, अंमलदार सिध्दार्थ थोरात, रवींद्र देशमुख, कैलास सोरमारे यांनी रिक्षामालक सय्यद मझरोद्दीनला अटक केली. मझरोद्दीनने दोन महिन्यांपूर्वीच मुजम्मिलला १२ तासांसाठी २५० रुपयांवर रिक्षा चालवण्यास दिली हाेती.

गैरकृत्यास मालकही जबाबदारचालकाकडून महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन, मद्यपान करून रिक्षा चालवल्यास, लुटमार, मारहाणीचे कृत्य झाल्यास रिक्षामालकही तेवढेच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षा