शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहरातील रस्ते कामातील सर्व अडथळे दूर करा; औरंगाबाद खंडपीठाचे महापालिकेला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 16:26 IST

नागरिकांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांची १५० कोटींची कामे त्वरित पूर्ण करा.

ठळक मुद्देजनतेला एक महिना अगोदर नोटीस द्या औरंगाबाद खंडपीठाचे महापालिकेला निर्देश

औरंगाबाद : नागरिकांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांची १५० कोटींची कामे त्वरित पूर्ण करा. या कामात येणाऱ्या धार्मिक स्थळांसह सर्व अडथळे त्वरित दूर करा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी गुरुवारी (दि.२९) महापालिकेला दिले. 

काम सुरू करण्याच्या एक महिना आधी संबंधितांना नोटीस देऊन रस्ता कामाची कल्पना द्या. जेणेकरून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ‘अंडर ग्राऊंड’ ड्रेनेज लाईन, विद्युत वाहिन्या, केबल्स अथवा अन्य कामासाठी  रस्ता खोदला जाणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदणाऱ्यांना दंड लावू, कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असा सक्त इशारा खंडपीठाने दिला.

खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारी खंडपीठात हजर झाले. त्यांनी १५० कोटींच्या रस्त्यांच्या कामांसंदर्भात शपथपत्र सादर केले. १०० कोटींच्या निधीमधून शहरातील ३० रस्त्यांची आणि ५० कोटींच्या निधीमधून २१ रस्त्यांची कामे पूर्ण करणार असल्याचे सांगून त्या रस्त्यांची यादी सादर केली. १०० कोटींच्या कामांसाठीचे ‘लेटर आॅफ अ‍ॅक्सेप्टन्स’ कंत्राटदारांना दिले. जे. पी. एंटरप्राईजेस, मुंबई यांची २० कोटी ५३ लाख रुपयांची निविदा, मस्कट कन्स्ट्रक्श्न्स कंपनी, औरंगाबाद यांची २० कोटी ३२ लाखांची, जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर, औरंगाबाद यांची १९ कोटी ५७ लाखांची आणि राजेश कन्स्ट्रक्शन कंपनी, मुंबई यांची १८ कोटी ८८ लाखांची निविदा स्वीकारल्याचे पत्र त्यांना दिले आहे.

बँक गॅरंटी व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शुक्रवारी कंत्राटदारांची मनपा आयुक्तांसोबत बैठक होऊन त्यांना कार्यादेश (वर्कआॅर्डर) देणार असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. ५० कोटींच्या कामांसाठीच्या निविदा जादा दराच्या असल्यामुळे त्या रद्द केल्या असून, लवकरच या कामाच्या निविदा नव्याने काढण्यात येतील. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग, रोड फर्निचर आदी कामांची एक कोटींची स्वतंत्र निविदा काढण्यात येईल, असे शपथपत्रात म्हटले आहे. शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचा प्रस्ताव महापालिका १० दिवसांत रेल्वे आणि शासनास देणार असल्याचे निवेदन करण्यात आले. पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी होईल.

अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करा

महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असून, शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार चालू असल्याचे आयुक्तांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले असता शासनाने एक महिन्यात दोन उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्तांची महापालिकेत प्रतिनियुक्ती करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ