शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

प्रलंबित प्रकल्पांची कामे निकाली काढा- दानवे

By admin | Updated: September 3, 2015 00:27 IST

जालना : राज्यातील काही भागात व मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळी सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन योग्य

जालना : राज्यातील काही भागात व मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळी सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन योग्य ते निर्णय घेत आहे़ सध्या जिल्ह्यात तीन वर्षांपासून काही प्रकल्प तांत्रिक कारणामुळे रखडलले असून प्रलंबित प्रकरणे सुरळीतपणे सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला लागावे, असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रलंबित प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी ए़ एस़ आऱ नायक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भारत कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शोभा ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र जगताप, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ए.जी़ ताठे, अधीक्षक अभियंता श्री़शिंदे, बेलापट्टे, तसेच उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते़खा. दानवे म्हणाले की, जिल्ह्यातील लघु, साठवण प्रकल्पासाठी शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या होत्या़ काही तांत्रिक कारणामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा रखडलेला आहे़ त्या तांत्रिक बाबीची पूर्तता करुन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा मावेजा त्वरित देण्यात यावा़तसेच योग्य त्या सोईसुविधा देऊन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्वरीत करावे असे नमूद करुन खा. दानवे यांनी जिल्ह्यातील नियोजित दरेगांव येथील ड्रायपोर्ट उभारणीसाठी भू-संपादनाच्या काही अडचणी आहेत. त्या लवकरच जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन ड्रायपोर्टचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत राजूर येथे होत असलेल्या विकास कामांचा आढावाही घेण्यात आला़ जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या़ (प्रतिनिधी)जालना : सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खा.रावसाहेब दानवे यांनी राजूर या गावाची काही दिवसांपूर्वी निवड केली आहे. या योजनेंतर्गत राजूर येथील सर्व ग्रामस्थांना आरोग्याविषयी सखोल माहिती व्हावी या उद्देशाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव तसेच जिल्हाधिकारी ए़ एस़ आऱ नायक यांच्या उपस्थितीत वैयक्तिक आरोग्य संचिकेचे विमोचन करण्यात आले़ ४जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संचिका काढण्यात आली असून, या संचिकेमध्ये बालक, पुरुष, स्त्रिया यांच्या आरोग्य तपासणीचा संपूर्ण माहिती मराठी भाषेत विषद करण्यात आली आहे. ही संचिका ग्रामस्थांच्या उपयोगात येईल़ ४या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भारत कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शोभा ठाकूर, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ए. जी.ताठे, अमोल गिते, जिल्हा परिषदेचे संबंधित व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते़