शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पीए म्हणून शिक्षकाची नियमबाह्य नियुक्ती

By admin | Updated: December 11, 2014 00:43 IST

माजलगाव : बालकाचा शिक्षणाचा हक्क कायदा अधिनियम २००९ कलम २७ नुसार शिक्षकाला इतर कामासाठी नियुक्ती करता येत नाही,

माजलगाव : बालकाचा शिक्षणाचा हक्क कायदा अधिनियम २००९ कलम २७ नुसार शिक्षकाला इतर कामासाठी नियुक्ती करता येत नाही, असे असताना देखील शिक्षकाला पंचायत समितीच्या सभापतीचा पीए म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. ही नियुक्ती नियमबाह्य असून, गटविकास अधिकाऱ्यांनी आरटीई कायद्याची पायमल्ली केली आहे. पंचायत समितीचे सभापती यांचे स्वीय सहायक म्हणून शिक्षक सुंदर राठोड यांची मागील तीन वर्षांपासून नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली आहे. बालकाला शिक्षणाचा हक्क कायदा अधिनियम २००९ च्या कलम २७ नुसार शिक्षकांना जनगणना, राष्ट्रीय आपत्ती आणि निवडणुका यासारख्या कोणत्याही कामासाठी नियुक्त करण्यात येऊ नये, असे सक्त आदेश दिलेले आहेत. असे असताना देखील सुंदर राठोड यांची सभापतीचे स्वीय सहायक म्हणून गटविकास अधिकारी के.ए. पांढरे यांनी नियुक्ती केली आहे. तीन वर्षांपूर्वी सभापती मनीषा गायकवाड यांचे व आता अनिता थावरे यांचे स्वीय सहायक म्हणून २ जुलै रोजी ४१२/२०१४ या पत्र क्रमांकानुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे. राठोड हे स्वीय सहायक झाल्यापासून त्यांनी अद्यापही शाळेचे तोंड पाहिलेले नाही. तसेच शिक्षकांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या व इतर शालेय कामात ढवळाढवळ करुन मानसिक त्रास देत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. या शिक्षकाची नियुक्ती तात्काळ रद्द करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.मागील दहा वर्षांपासून सुंदर राठोड यांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. आरटीई कायद्याची पायमल्ली करुन अध्यापनाऐवजी शासकीय पदाधिकाऱ्यांचे पीए म्हणून नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा प्रकरणात वरिष्ठ अधिकारी लक्ष घालतील का? आणि दोषींवर कारवाई करतील का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. याबाबत माजलगाव तालुक्यात चर्चेला उधाण आले असून, नियुक्ती रद्द करण्याची मागणी होत आहे. सुंदर राठोड यांना स्वीय सहायक म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस सभापतींनी केली होती. त्यामुळे मी त्यांची नियुक्ती केली आहे. या अगोदरही त्यांची स्वीय सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, असे गटविकास अधिकारी के.ए. पांढरे यांनी सांगितले. (वार्ताहर)४सुंदर राठोड या शिक्षकाला सभापतीचे पीए म्हणून नियुक्ती दिली आहे. ही नियुक्ती नियमबाह्य आहे.४नियमबाह्य नियुक्ती असतानाही ती रद्द करण्यासाठी सभापतींकडूनच संबंधित अधिकाऱ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिक्षकांमधून केला जात आहे.४आरटीई कायद्याची पायमल्ली करून शिक्षकाची नियमबाह्य नियुक्ती करणाऱ्या गटविकास अधिकारी पांढरे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.