शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

कार चोरीची फिर्याद नोंदवायची; मग कोर्टाकडून आदेश आणा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:24 AM

कारचोरीची तक्रार नोंदविण्यासाठी पुंडलिकनगर ठाण्यात गेलेल्या एका माजी सैनिकाला पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी ‘तुम्ही कोर्टाकडून आदेश आणा, तरच फिर्याद नोंदवितो’, असा अजब सल्ला दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कारचोरीची तक्रार नोंदविण्यासाठी पुंडलिकनगर ठाण्यात गेलेल्या एका माजी सैनिकाला पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी चक्क सात दिवस फिरवले. फिर्याद नोंदवून घेतली नाहीच उलट त्या माजी सैनिकालाच आरोपीच्या पिंजºयात उभे करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘तुम्ही कोर्टाकडून आदेश आणा, तरच फिर्याद नोंदवितो’, असा अजब सल्ला मुदिराज यांनी दिला.पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जवळ जाण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे मात्र त्यांचेच अधिकारी सामान्य तक्रारदारांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे करून तक्रार नोंदवून घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली.सिडको एन-४ येथील रहिवासी कचरू त्र्यंबकराव अढागळे हे नुकतेच भारतीय सेना दलात २८वर्षे सेवा करून निवृत्त झाले. १७ आॅगस्ट रोजी त्यांच्या घरासमोरून त्यांच्या मालकीची कार क्रमांक (एमएच-२० बीटी ६२६०)चोरट्यांनी चोरून नेली. दुसºया दिवशी सकाळी १८ आॅगस्ट रोजी अढागळे हे पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता तेथील ठाणे अंमलदार यांनी साहेब नाही, तुम्ही सायंकाळी या, असे त्यांना सांगितले. यामुळे ते सायंकाळी गेले तेव्हाही वरिष्ठ आले नाही,असे सांगून दुसºया दिवशी येण्यास सांगण्यात आले. १९ रोजी सकाळी तक्रारदार हे पो.नि. मुदिराज यांना भेटले तेव्हा त्यांनी तक्रारदार गाडीचा शोध घेतो, दोन दिवसांत गाडी न सापडल्यास फिर्याद नोंदवून घेतो, असे सांगून परत पाठविले. दोन दिवसांनंतर पोलिसांकडून त्यांना कोणताही फोन न आल्याने २२ आॅगस्ट रोजी तक्रारदार हे निरीक्षकांना भेटले. तेव्हा मुदिराज म्हणाले की,‘मी तुमच्या गाडीची सखोल चौकशी केली आहे, बँकेच्या कर्जाचे हप्ते थकवून क्लेम मिळविण्यासाठी खोटी (पान २ वर)तक्रार करीत आहात, तुम्हीच गाडी लपविली ’,असा आरोप त्यांच्यावर केला. पोलीस निरीक्षकांच्या या आरोपाने तक्रारदार यांना धक्काच बसला. गाडीचा विमाच उतरविला नाही, यामुळे मी क्लेमसाठी तक्रार करीत नाही, तर माझ्या गाडीचा दुरुपयोग आरोपी करू शकतात, म्हणून तक्रार करीत असल्याचे म्हणाले. तेव्हा कोर्टात जा आणि कोर्टाकडून आदेश आणल्यानंतरच कार चोरीचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा अजब सल्ला देऊन मुदिराज यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.