शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

झालर क्षेत्रातील रजिस्ट्री बंद

By admin | Updated: December 25, 2015 00:07 IST

औरंगाबाद : सिडको प्रशासनाने झालर क्षेत्रात रेखांकन मंजुरीसाठी एनओसी घेणे बंधनकारक केले आहे.

औरंगाबाद : सिडको प्रशासनाने झालर क्षेत्रात रेखांकन मंजुरीसाठी एनओसी घेणे बंधनकारक केले आहे. त्याचा फटका मालमत्तांचे व्यवहार करणाऱ्यांना बसला असून, मागील काही दिवसांपासून २८ गावांतील रजिस्ट्री बंद करण्यात आल्या आहेत. या गावांकरिता शासनाने सिडकोची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. आराखड्याला मंजुरी मिळेना, सिडको एनओसी देईना, अशा परिस्थितीत झालर क्षेत्र अडकले आहे. ३० नोव्हेंबर २००८ पासून या २८ गावांत सिडकोने नियोजन करण्यास सुुरुवात केली. त्यासाठी विद्यमान भूवापर व उर्वरित जमिनीचा आरक्षण आराखडा तयार केला. त्या आराखड्यावर आक्षेप आल्यानंतर नव्याने आराखडा तयार करण्यात आला. २०१३ पर्यंत दोन आराखडे तयार झाले. शासनाकडे दुसरा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे झालर क्षेत्रात अतिक्रमणे आणि अनधिकृत प्लॉटिंगचे प्रमाण वाढत आहे. शिवाय एनए-४४ चे रेखांकनदेखील होत आहेत; परंतु त्या रेखांकनांमुळे सिडकोच्या नियोजनावर परिणाम होत असल्यामुळे वरिष्ठ नियोजनकार नगररचना आशुतोष उईके यांनी मुद्रांक विभागाला पत्र दिले. त्या पत्रात सिडकोने म्हटले आहे की, झालर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे विकासकार्य करण्यासाठी सिडकोची एनओसी घेणे बंधनकारक आहे. सिडकोने अंतिम रेखांकन परवानगी दिल्यानंतर रेखांकनातील अंतर्गत सेवा-सुविधा त्यात रस्ते, विद्युत वाहिनी, जल व मलनि:सारण वाहिनी इ. सुविधांची पूर्तता करणे बंधनकारक आहे; परंतु सिडकोची एनओसी न घेता भूखंड, सदनिका खरेदी-विक्रीच्या नोंदी रजिस्ट्री विभागामार्फत घेण्यात येत आहेत. झालर क्षेत्रातील २८ गावांतील मंजूर रेखांकनातील भूखंड, सदनिका खरेदी-विक्रीसाठी सिडकोच्या एनओसीविना मालमत्ता व्यवहारांची नोंदणी करण्यात येऊ नये. या २८ गावांना फटका; एनओसी सक्तीचे सातारा, देवळाई, बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्ची घाटी, मल्हारपूर, मांडकी, गोपालपूर, पिसादेवी, कृष्णापूर, तुळापूर, सावंगी, अशरफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, दौलतपूर, बागतलाव, साजापूर, गेवराई, गेवराई तांडा, अंतापूर या भागात झालर क्षेत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. सिडकोने याच परिसरात एनओसी बंधनकारक केली आहे.