शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दबाव झुगारून समितीने केली विद्यापीठ कुलसचिवांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:26 IST

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा निर्णय

ठळक मुद्देतीनही संवैधानिक पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा अधिष्ठातांचा कार्यकाळ विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ अथवा किमान साडेतीन वर्षे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने बहुप्रतीक्षित तीन संवैधानिक पदे व चार अधिष्ठातांची निवड केली. कुलसचिवपदी डॉ. जयश्री सूर्यवंशी, विद्यापीठ उपपरिसर संचालकपदी डॉ. दत्तात्रय गायकवाड, तर परीक्षा मंडळ संचालकपदी डॉ. योगेश पाटील या तिघांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना समितीने कोणत्याही गटातटाच्या हस्तक्षेपाला थारा दिला नाही, हे विशेष!

यासंदर्भात पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. येवले यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कारणांमुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कुलसचिव, परीक्षा मंडळ संचालक, उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपपरिसरासाठी संचालक तसेच वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, आंतरविद्याशाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखांच्या अधिष्ठांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.७, १४ आणि १५ मार्च रोजी निवड समितीने घेतल्या. विद्यापीठ प्रशासनाने सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरीतीने पार पाडली.

आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड व सहकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी ७ अर्ज आले होते. ५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या पदासाठी शिवाजी विद्यापीठातील डॉ. चेतना सोनकांबळे यांची निवड झाली. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्राच्या अधिष्ठातापदासाठी ५ अर्ज आले होते. या पदासाठी डॉ. वाल्मीक सरवदे यांची निवड झाली. मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विभागाच्या अधिष्ठातापदासाठी डॉ. प्रशांत अमृतकर यांची, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी डॉ. भालचंद्र वायकर यांची निवड करण्यात आली.  कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये राज्यपालांचे सदस्य किशोर शितोळे, व्यवस्थापन परिषदेचे एक सदस्य, प्रकुलगुरू आदींचा समावेश होता.

तीनही पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणारकुलसचिवपदासाठी प्राप्त ३९ अर्जदारांपैकी १८ जणांनी मुलाखत दिली. यामध्ये डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची निवड झाली. परीक्षा मंडळाच्या संचालकपदी लोणेरे येथील ‘बार्टी’चे परीक्षा नियंत्रक योगेश पाटील आणि उस्मानाबाद विद्यापीठ परिसराच्या संचालकपदी डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची निवड करण्यात आली. या तीनही संवैधानिक पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल, तर अधिष्ठातांचा कार्यकाळ विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ अथवा किमान साडेतीन वर्षे राहील.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणProfessorप्राध्यापक