शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची फीस भरण्यावरून लाल, हिरवे कार्ड; विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर रोखल्याने पालक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 14:39 IST

शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारासमोरच रोखल्याचे कळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली. सुरक्षारक्षकांनी पालकांना गेटवरच रोखले.

औरंगाबाद : शहानूरवाडी परिसरातील दी जैन इंटरनॅशनल शाळेच्या व्यवस्थापनाने शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना रेड कार्ड देऊन प्रवेशद्वाराबाहेर रोखल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ९ वाजता घडला. पालकांनी रोष व्यक्त केल्यावर नरमाईची भूमिका घेत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.

शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारासमोरच रोखल्याचे कळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली. सुरक्षारक्षकांनी पालकांना गेटवरच रोखले. पालक संतप्त झाल्याने शालेय प्रशासनाने पोलिसांना बोलावले. ज्यांच्याकडे ३ महिन्यांपासून पैसे थकलेत अशांना लाल, ज्या पालकांनी पैसे भरण्याचे आश्वासन दिलेत, त्यांच्यासाठी पिवळ्या, ज्यांनी शुल्क भरले अशांना हिरव्या रंगाचे पास दिले, असा भेदभाव चुकीचा आहे. शाळा नियमांचे उल्लंघन करते आहे. पालकांनी वेळोवेळी व्यवस्थापनाच्या विराेधात शिक्षण विभागात तक्रारी केलेल्या आहेत. चौकशी समितीने शाळेच्या अनियमिततेविरुद्ध अहवाल दिला असून शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेश जोगदंड, एस. एस. चौधरी, पी. डी. मांगुळकर, विशाल पंजावी, विनोद गंगवाल, विशाल राठी, विशाल ठोले, सुदेश चुडीवाल, योगेश बंगाळे, गीतेश बैनाडे, अमित कासलीवाल आदींसह पालकांनी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे पालकांनी सांगितले.

रोखले नव्हते, विचारपूस केलीशाळेने मुलांना रोखले नव्हते तर शाळा शुल्काबाबत विचारपूस करून विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले. पालकांनी शुल्क भरणे गरजेचे आहे. शाळा प्रशासनाला शिक्षकांचे पगार, लाईटबिल, विविध कर, स्कूलबस आदी खर्च याच शुल्कातून भागवावा लागतो. या बाबींचा पालकांनी सहानुभूतीपूर्वक विचार करुन थकीत शुल्क भरावे. यापुढे पालकांना शुल्काबाबत संदेश पाठवण्यात येणार नाही.- शीखा श्रीवास्तव, उपप्राचार्य, दि जैन इंटरनॅशनल स्कूल

विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याची शाळेची कृती

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाची शाळेने अवहेलना केली आहे. पालकांनी शाळेविरोधात अवमान याचिका दाखल करावी. शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार शाळेवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करण्याची शाळेची कृती निंदनीय असून आम्ही सीबीएसई, राज्य व राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याकडे तक्रार करू.-उदयकुमार सोनोने, पॅरेन्ट ॲक्शन कमिटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी