- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : लाल मिरचीचा झणझणीतपणा आता अजूनच वाढला असून ती बाजारात थेट २६ हजार ते एक लाख रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच लाल मिरची एवढी तेजतर्रार झाली आहे.
एक लाख रुपयांत रसगुल्ला मिरचीखान्देशातून येणारी रसगुल्ला लाल मिरची चक्क ९५ हजार रुपये ते एक लाख रुपये क्विंटल भावाने विकली जाते आहे. ही मिरची दिसण्यास एकदम लाल भडक असते; पण तिखटपणा कमी असतो. यामुळे त्यास रसगुल्ला लाल मिरची म्हटले जाते. मागील हंगामात ही मिरची ४० हजार ते ४५ हजार रुपये क्विंटल विकली होती. महाग असल्याने व्यापाऱ्यांनी रसगुल्ला मिरची खरेदी करणे बंद केले आहे.
बेडगी अर्ध्या लाखातकनार्टक राज्यात बेडगी नावाचे गाव आहे. तेथून बेडगी लाल मिरची बाजारात येते. आजघडीला ही मिरची ४७ हजार ते ५१ हजार रुपये दराने प्रति क्विंटल विकली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी याच मिरचीचे भाव ३० हजार ते ३५ हजार रुपये होते.
शहरात ८० टक्के नागरिक खातात गुंटूर मिरचीशहरात तिखट, झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकूण विक्रीपैकी ८० टक्के नागरिक आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीचे तिखट खातात. १८ हजार ते २० हजार रुपये क्विंटलने विकणारी ही मिरची सध्या ३१ हजार रुपये ते ३२ हजार रुपये क्विंटल दराने मिळत आहे.
का महागली मिरची?नवीन मिरचीचा हंगाम ‘मार्च’ ते ‘मे’ हे तीन महिने असतो. मागील हंगामात अतिपावसाचा फटका मिरची उत्पादक महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांना बसला होता. मिरचीचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाले होते. सध्या बाजारात शीतगृहातील लाल मिरचीची आवक होत आहे. नवीन लाल मिरची येण्यासाठी आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. मिरची पावडर बनविणाऱ्या कंपन्याकडून लाल मिरचीला मागणी वाढल्याने भाव कडाडले.
हंगामात महिनाभरात ३० ते ४० टन विक्रीमार्च ते मे महिन्यात लाल मिरचीचा हंगाम असतो. या काळात दर महिन्याला ३० ते ४० टन लाल मिरची विकली जाते. एरव्ही लाल मिरचीपेक्षा रेडिमेड मिरची पावडर जास्त विकल्या जाते.
लाल मिरचीचे भाव वाचून तुमचे डोळे पांढरे होतील.लाल मिरची.........सप्टेंबर.................नोव्हेंबरगुंटूर...........१८,००० ते २०,०००......३१,००० ते ३२,०००तेजा...........१८,००० ते २०,०००.......२६,५०० ते २८,०००ब्याडगी.......३०,००० ते ३५,०००.......४७,५०० ते ५१,०००रसगुल्ला......४०,००० ते ४५,०००.....९५,००० ते १,००,०००
लाल मिरचीचे प्रतिकिलो दरगुंटूर : ३४० रुपयेतेजा : ३२० रुपयेबेडगी : ५६० रुपयेचपाटा : ४२० रुपये