शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

९७ हजार बेशिस्त वाहनचालकांकडून तीन कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:37 IST

वाहतूक नियमन करता करता शहर पोलिसांनी वर्षभरात तब्बल ९७ हजार वाहनचालकांना नियम मोडताना पकडले. या चालकांकडून ३ कोटी २४ लाख ६७ हजार ४७२ रुपये दंड वसूल करण्यात आला.

औरंगाबाद : वाहतूक नियमन करता करता शहर पोलिसांनी वर्षभरात तब्बल ९७ हजार वाहनचालकांना नियम मोडताना पकडले. या चालकांकडून ३ कोटी २४ लाख ६७ हजार ४७२ रुपये दंड वसूल करण्यात आला.

पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतूक नियमन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत आहे. या वाहतूक विभागांतर्गत शहर शाखा एक आणि शाखा दोन सोबतच, सिडको, छावणी आणि वाळूज, अशा एकूण पाच शाखेत ३५० पोलीस कार्यरत आहे. वाहतूक नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत शहर पोलिसांनी नियम मोडणाºया ९७ हजार ४७२ बेशिस्त वाहनचालकांना पकडले. यात परवान्याचे उल्लंघन करणे, राँग पार्किंग करणे, स्टॅण्ड सोडून वाहन उभे करणे, रिक्षात चालकाशेजारी प्रवासी बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहने चालविणे. विनासीटबेल्ट कार चालविणे, ट्रीपल सीट दुचाकी पळविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, विनानोंदणी वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनांत बदल करणे, फिटनेस प्रमाणपत्र नसलेले वाहन चालविणे, वाहनांवर फॅन्सी आणि अस्पष्ट नंबर टाकणे, विनागणवेश टॅक्सी चालविणे, यासह मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

‘नो एंट्री’त पकडले सर्वाधिक वाहनचालकजड वाहनांना शहरात प्रवेश मनाई आहे. याशिवाय बायपासवरील अपघात टाळण्यासाठी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करताना सर्वाधिक २९ हजार ७५५ वाहनचालकांना पकडण्यात आले. या वाहनचालकांकडून ६६ लाख ६१ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. भरधाव वेगाने वाहने पळविणाºया पावणेदोनशे वाहनचालकांना पोलिसांनी पकडले.

अकराशे मद्यपी वाहनचालक ांवर कारवाईदारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, ही बाब लक्षात घेऊन वर्षभरात अकराशे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एच. एस. भापकर यांनी दिली. ते म्हणाले की, मद्यपी वाहनचालकांकडून २५ लाख २९ हजार ९०० रुपये दंड भरून घेण्यात आला.

४ हजार ८३४ दुचाकीस्वारांना पकडले विनाहेल्मेट४ हजार ८३४ जणांना विनाहेल्मेट दुचाकी चालविताना तर ९ हजार ४६१ जणांना सीटबेल्टविना कार चालविताना पकडून दंड वसूल केला.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtraffic policeवाहतूक पोलीस