शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लाभार्थ्यांकडून अधिकच्या लोकवाट्याची वसुली !

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

नळदुर्ग : तब्बल सात वर्षापासून रखडलेल्या घरकूल योजनेतील लाभार्थ्यांकडून पालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून अधिकचा लोकवाटा वसूल करीत आहेत़

नळदुर्ग : तब्बल सात वर्षापासून रखडलेल्या घरकूल योजनेतील लाभार्थ्यांकडून पालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून अधिकचा लोकवाटा वसूल करीत आहेत़ विशेष म्हणजे शासनाकडून अधिकचा लोकवाटा घेण्याबाबत कोणतेही परिपत्रक नाही़ शिवाय घरकुल कामाचा दर्जा खालावला असून, बांधलेल्या घरांचीही काही वर्षातच दूरवस्था झाली आहे़केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकूवत असलेल्या १२०६ लाभार्थ्यांसाठी घरकूल मंजूर झाले होते़ ८० हजार रूपये किंमत असलेल्या घरकुलासाठी केंद्र शासनाकडून ८० टक्के तर केंद्र व लाभार्थ्यांकडून प्रत्येकी १० टक्के वाटा घेण्यात येणार होता़ सन २००७-०८ मध्ये या योजनेच्या कामास सुरूवात करण्यात आली़ मात्र, आज घडीला केवळ ३०२ घरकुलांची कामे पूर्ण असून, ४० कामे प्रगतीपथावर तर ३६ कामे अर्धवट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़ त्यातच चालू बाजार दराने एक लाख पाच हजार रूपये दराने घरकूल देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ त्यामुळे आता लाभार्थ्यांना १० टक्केनुसार जवळपास १० हजार ९० रूपये लोकवाटा द्यावा लागतो़ असे असताना पालिकेचे कर्मचारी लाभार्थ्यांकडून २९ हजार ३५१ रूपये घेत आहे़ विशेष म्हणजे अशी वाढीव रक्कम घेण्यासाठी शासनाचे कोणतेही आदेश नसले तरी अधिकाऱ्यांचे तोंडी आदेश असल्याचे कर्मचारी सांगतात़ लोकवाटा आणि घरकुलाची वाढीव किंमत यातही तफावत असल्याने लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याने संताप व्यक्त होत आहे़केंद्र शासनाच्या योजनेत १२०६ घरकूल मंजूर असताना पालिकेकडून १८८९ नागरिकांकडून लोकवाटा भरून घेण्यात आला होता़ त्यापोटी पालिकेला ८३ लाख रूपये मिळाले होते़ ही योजना पूर्णत्वास येवू शकत नसल्याचे जाणवू लागल्यानंतर सुमारे ३०० लोकांनी १२ लाख रूपयांचा लोकवाटा परत घेतला आहे़ पूर्ण असलेल्या ३०२ घरांपैकी २६५ घरांची दारे, खिडक्या मोडल्या आहेत़ ही घरे वाटपास पालिकेला मुहूर्त मिळाला नसला तरी काहींनी त्यात वास्तव्य सुरू केले आहे़ एकीकडे रखडलेली कामे, बांधकामचा घसरलेला दर्जा याकडे दूर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने आता केवळ तोंडी आदेशावर नियम ढाब्यावर बसवून जवळपास २७़९५ टक्के लोकवाटा वसूल करण्यास सुरूवात केली आहे़ (वार्ताहर)