शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पैठण तालुक्यातील ५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 13:04 IST

Rain in Aurangabad : गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यात सोमवारी पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या काही दिवसा पासून दडी मारलेला पाऊस तालुक्यात धौधो बरसल्याने  महत्वाच्या नद्या नाले व ओढ्यांना पूर आला. विरभद्रा नदीला आलेल्या महापुराने गेल्या २४ तासापासून नांदर गावाचा संपर्क तूटला आहे. शेतशिवारात व उभ्या पिकात पाणीच पाणी साचले आहे.

गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. परंतु, सकाळी जमा झालेले ढग न बरसताच निघून जात असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. सोमवारी दुपारनंतर तालुक्यात पावसास प्रारंभ झाला. बालानगर, आडूळ, पाचोड, विहामांडवा व नांदर महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील वीरभ्रदा या प्रमुख नदीस महापूर आला. यामुळे नांदर या मोठ्या गावाचा संपर्क मंगळवारी सकाळी १० वाजे पर्यंत बंद होता. अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटले होते. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतशिवारातील उभ्या पिकात पाणी साचल्याने काही भागात पिकांच्या नुकसानीस हा पाऊस कारणीभूत होणार आहे.

पैठण तालुक्यात सोमवारी पैठण २५ मि मी (३७४), पिंपळवाडी पिराची ३८ मिमी (३८९) , बिडकीन १०मिमी (३९७),ढोरकीन ४४ मिमी (३८३), बालानगर ८५ मि मी (३९८), नांदर  ८१मि मी (४०६), आडूळ ६६ मिमी (३८३), पाचोड ७५ मिमी (३८४), लोहगाव १५ मिमी (३७५),विहामांडवा ९३ मिमी (४७५) अशी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी तालुक्यात एकूण ५३२ मिमी पाऊस झाला असून सरासरी ५३.२० मिमी ईतकी नोंद झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पाऊस ३९६४ मिमी झाला असून एकूण सरासरी पैकी ३९६.४० मिमी ईतका पाऊस झाल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी