शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्द, बालविकास अधिकारी निलंबित; मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:29 IST

विद्यादीप बालसुधारगृह प्रकरण गंभीर वळणावर; मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर कारवाई, न्यायालयाकडून सुमोटो याचिका

छत्रपती संभाजीनगर/मुंबई : विद्यादीप बालसुधारगृहातील मुलींवर अमानवी आणि अघोरी वागणुकीच्या धक्कादायक प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून आता हे प्रकरण गंभीर वळणावर पोहोचले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संस्थेची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर जिल्हा बालविकास अधिकारी यांना निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी विधान परिषदेच्या सभागृहात जाहीर केले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला कडक पावले उचलावी लागली आहेत. त्यांनी या प्रकरणात जिल्हा बालविकास अधिकारी बडतर्फीची मागणी केली. दानवे यांनी या संस्थेवर धर्मांतरणाचे आरोपही केले असून, संस्थेचा परवाना ५ मे २०२५ रोजीच संपलेला असूनही ते अवैधरीत्या सुरु ठेवण्यात आल्याची माहिती दिली. आ. चित्रा वाघ यांनी याप्रकरणी अल्पसूचनेद्वारे विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या दुर्लक्षावरही टीका करण्यात आली.

न्यायालयाची तातडीने दखलमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘लोकमत’ने १ ते ७ जुलैदरम्यान प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेच्या आधारे ‘सुमोटो’ जनहित याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने वरिष्ठ विधिज्ञ प्रशांत कातनेश्वरकर यांची ‘न्यायालय मित्र’ म्हणून नियुक्ती केली आहे. बालगृहातील मुलींना इतरत्र स्थलांतरित करण्याची आणि तातडीने एफआयआर दाखल करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. खबरदारी आणि वैधानिक अनियमिततेबद्दल खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परवान्याची मुदत संपूनही ८० अल्पवयीन मुलींना अशा बालगृहात ठेवण्यात आले, ही बाब गंभीर असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी