शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:36 IST

ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर जिल्ह्यात १९१ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले तर ३७ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रकिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दबावतंत्राच्या राजकारणाचे संकेत मिळाले होते. अर्ज नेणाऱ्यांमध्ये महायुती व महाविकास आघाडीतील अनेक जण होते. शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी अर्ज नेल्यामुळे बंडखोरीचा अलर्ट मिळालाच होता. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मंगळवार आहे.

फुलंब्री मतदारसंघातून भाजपचे प्रदीप पाटील, भाऊसाहेब ताठे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण विरोधात बंड पुकारले. कन्नडमधून संजना जाधव यांनी शिंदे गटात उमेदवारीसाठी प्रवेश केला आहे. तत्पूर्वी संजय गव्हाणे यांनी भाजप म्हणून उमेदवारी दाखल केली तसेच स्वाती कोल्हे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अप) कडून अर्ज भरला आहे. सिल्लोडमध्ये सविता घरमोडे यांनी ठाकरे गटातून अर्ज भरला.

पूर्व मतदारसंघातून विठ्ठल जाधव यांनी राष्ट्रवादी (शप) कडून उमेदवारी दाखल करून आघाडी विरोधात दंड थोपटले. पैठणमधून महाविकास आघाडी विरोधात कांचनकुमार चाटे, संजय वाघचौरे उमेदवारी अर्ज भरला. गंगापूरमधून सुरेश सोनवणे यांनी भाजप विरोधात अर्ज दाखल केला तर वैजापूरमधून सचिन वाणी यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात अर्ज भरला.

४ नोव्हेंबरला कळेल बंडखोरी की दबावतंत्र..?कन्नडपैठणवगळता युती व आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत परंतु इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल.

मतदारसंघ बदलण्याचा गनिमी कावाशहरातील पूर्व मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अर्ज दाखल केला. पूर्व मतदारसंघातही उद्धवसेना आघाडी उमेदवाराच्या विराेधात २९ रोजी अर्ज भरणार आहे. एमआयएमच्या मध्य व पूर्व मतदारसंघातील उमेदवारांनी अद्याप उमेदवारी दाखल केलेली नाही. सोमवारच्या राजकीय घडामोडी पाहता ऐनवेळी मतदारसंघ बदलण्याचा गनिमी कावा एमआयएम करण्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात दाखल झालेले उमेदवारी अर्जसिल्लोड- २२कन्नड - १८फुलंब्री - २४औरंगाबाद (मध्य) - १४औरंगाबाद (पश्चिम) - १२औरंगाबाद(पूर्व) - ४१पैठण - ३१गंगापूर - १६वैजापूर -१३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमphulambri-acफुलंब्रीsillod-acसिल्लोडkannad-acकन्नडvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरpaithan-acपैठण