शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे लाइव्ह लोकेशन पाहून मित्रालासोबत घेतले;काही कळायच्या आत समोर उडी घेत जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:19 IST

प्रेमप्रकरणातून आत्महत्या, मित्राला फिरून येऊ म्हणत गाठला रेल्वेरूळ

औरंगाबाद : फिरून येऊ म्हणत मित्राला घरातून काढत रेल्वेरुळांवर नेले. तेथे मित्राच्या समोरच धावत्या रेल्वेखाली उडी घेत सीएचा अभ्यास करणाऱ्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली. रूपेश दिगंबर देवडे (२४, ह.मु. अजबनगर, औरंगाबाद, मूळ रा. म्हसोबा गल्ली, सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

रूपेश शिक्षणात हुशार असल्यामुळे त्याला आईवडिलांनी सीए होण्यासाठी औरंगाबादला पाठवले होते. अजबनगर भागात नीलेश कोठाळे या विद्यार्थ्यासोबत किरायाच्या रूममध्ये तो राहत होता. मंगळवारी रात्री रूपेशच्या हट्टापायी दोघांनी मेसमध्ये एकाच ताटात जेवण केले. त्यानंतर, नीलेशला सोडून रूपेश त्याचा दुसरा मित्र अश्वजित जाधवकडे गेला. त्याला चल फिरून येऊ, असे म्हणत दोघेही दुचाकीवरून संग्रामनगर उड्डाणपुलाच्या दिशेने गेले. रूपेश लघुशंकेची थाप मारून अश्वजितला रेल्वेरुळांच्या दिशेने घेऊन गेला. त्या ठिकाणी रेल्वे येताच त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार संजय शिरसाठ करीत आहेत.

आत्महत्येसाठी पाहिले रेल्वेचे लोकेशनरूपेशने आत्महत्या करण्याचे ठरविले होते. दुचाकीवर जात असताना त्याने मित्र अश्वजितला 'आज माझा शेवटचा दिवस आहे' असे बोलला. त्यावर अश्वजितने काहीही बोलू नको म्हणत त्याचे वाक्य सहज घेतले. रेल्वेसमोर उडी घेण्यापूर्वी त्याने मोबाइल बाजूला फेकला. उपस्थितांना जेव्हा रूपेशचा मोबाइल सापडला, त्यावेळी त्याच्या मोबाइलमध्ये रेल्वेचे लाइव्ह लोकेशन आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू