शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
3
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
4
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
5
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
6
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
7
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
8
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
9
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
11
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
12
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
13
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
14
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
15
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
16
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
17
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
18
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
19
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
20
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:49 IST

Chhatrapati Sambhajinagar Election 2026 BJP Rift: एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

छत्रपती संभाजीनगर: महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू असलेला गृहकलह आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. मंगळवारी रात्री भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची गाडी रोखून धरली, तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला तीव्र निषेध नोंदवला. याचवेळी प्रशांत भदाने या कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिस संरक्षणात सावे आणि कराड यांनी काढता पाय घेतला.

नेत्यांच्या पीएला तिकीट, कार्यकर्त्यांना काय? "मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो, रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला," असा आरोप प्रशांत भदाने पाटील या संतप्त कार्यकर्त्याने केला. "मला अंधारात ठेवले गेले, आता जर मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल," असा इशाराही त्याने दिला. तसेच कराड यांनी जातीवर आणि सावे यांनी त्यांच्या पीएला नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दुसरीकडे, उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या सुवर्णा मराठे यांनी कडाक्याच्या थंडीत प्रचार कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केले आहे.

महिला कार्यकर्त्या आक्रमक; शितोळेंना धरलं धारेवर पक्षाच्या वरिष्ठ महिला कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची घेराबंदी केली. "जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून डावलले जाते आणि केवळ शिस्तीच्या नावाखाली आमचा बळी दिला जातो," असा आरोप महिलांनी केला. दिव्या मराठे यांनी थेट आव्हान देत म्हटले की, "चार-चार वेळा ठराविक लोकांनाच तिकीट दिले जाते. आम्हाला आधी प्रचार करायला सांगता आणि मग डावलता. आता हकालपट्टी केली तरी चालेल, पण अन्याय सहन करणार नाही."

नेत्यांचा सावध पवित्रा शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र संताप इतका होता की कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणी नव्हते. शितोळे यांनी "शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही," असे म्हटले असले तरी, निष्ठावंतांच्या या उठावामुळे भाजपच्या विजयाच्या गणितांना सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपच्या १५ उमेदवारांनी पक्षादेश डावलून उमेदवारी भरलीतसेच त्यांनी पक्ष कार्यालयात राडा देखील केला. त्या सर्व नाराजांशी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी बुधवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात चर्चा केली. १५ जणांचे बंड शांत होईल, त्यांनी भरलेला उमेदवारी अर्ज ते मागे घेतील, असा दावाही शितोळे यांनी केला. भाजपत नाराजांची संख्या प्रचंड आहे. याचाच अर्थ भाजप हा जिवंत पक्ष आहे. इथे एका जागेसाठी लढणारे दहा-बारा जण होते, त्यामुळे स्वाभाविकच नाराजी असणं समजू शकतो; परंतु विरोधकांकडे उमेदवार नाहीत. त्यामुळे विरोधकांकडे नाराजी होण्याचा प्रश्नच नव्हता. भाजप हे कुटुंब आहे, इथे नाराजी घरात येऊन आपल्या जिल्हाध्यक्षाकडे व्यक्त करणे यात गैर काहीच नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Turmoil in Sambhajinagar: Workers Protest Ticket Distribution, Vandalize Vehicles.

Web Summary : Ticket distribution sparked chaos in Sambhajinagar BJP. Workers vandalized vehicles and attempted self-immolation. Disgruntled members cite favoritism and nepotism. Senior leaders face backlash, with some starting hunger strikes.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपा