शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा वाघिणी अहमदाबादला रवाना; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

By मुजीब देवणीकर | Updated: February 20, 2023 16:35 IST

जड अंत:करणाने निरोप; वाघिणींसह सहा काळविटेही अहमदाबादला रवाना

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील रंजना आणि प्रतिभा या दोन वाघिणी रविवारी सकाळी अहमदाबादकडे रवाना झाल्या. त्यांच्यासोबत सहा काळवीटही पाठविण्यात आले. प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी वाघिणींना जड अंत:करणाने निरोप दिला.

प्राणिसंग्रहालयातच जन्मलेल्या दोन्ही वाघिणींचा कर्मचाऱ्यांना बराच लळा हाेता. अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाने औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाला १० सायाळ, २ इमू, ३ कोल्हे, ६ स्पूनबिल हे पशुपक्षी दिले. त्या बदल्यात दोन वाघिणी आणि काळवीट देण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले होते. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रतिभा आणि रंजना यांच्या ‘घरा’समोरच पिंजरे लावण्यात आले. अगोदर प्रतिभा वाघिणीला पिंजऱ्यात सोडण्यात आले. त्यानंतर रंजनाला पिंजऱ्यात सोडले. वाघिणी पिंजऱ्यात येताच दरवाजा बंद करून हे पिंजरे वाहनाकडे घेऊन जात असताना वाघिणींनी डरकाळ्या फोडल्या. पिंजऱ्यात गोल फिरताना सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वाघिणी एकटक पाहत होत्या. मनपा कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले.

पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळवाघिणींचे केअर टेकर मोहंमद झिया, सोमनाथ मोटे, रज्जाक कुरेशी, शुभम साळुंके, मोहंमद जाफर, भागीनाथ म्हस्के, जयसिंग चव्हाण यांना दोन्ही वाघिणींचा लळा लागला होता. त्यांच्या एका आवाजावर त्या ‘घरा’तून बाहेर येत असत. दररोजचे जेवण हेच कर्मचारी देत होते. प्राणिसंग्रहालयातच जन्मलेल्या या वाघिणींना कर्मचाऱ्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळले. दोघींना नेत असताना कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

आठ जणांचे पथकअहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाचे सहायक अधीक्षक राजेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांचे पथक वाघिणी नेण्यासाठी आले होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी तौर, सल्लागार डॉ. बी. एस. नाईकवाडे, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नीतीसिंग चौहान, पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन आदींची उपस्थिती होती.

ताशी ५० चा वेग ठेवणारऔरंगाबाद ते अहमदाबाद ६२६ किलोमीटर अंतर आहे. वेगाने वाहन चालविले तर वाघीण, काळवीट ‘शॉक’मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे ताशी ५० किमीच्या वेगाने पथक प्रवास करीत आहे. दर चार तासांनंतर थोडेसे थांबून प्राण्यांना पाणी देण्यात येते. औरंगाबादहून निघण्यापूर्वी दोन्ही वाघिणींना जेवण देण्यात आले. अहमदाबादच्या पथकाने या प्राण्यांचे जेवणही सोबत नेले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका