शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांची रांगोळी; कॅंब्रिज चौकाजवळ वाहनचालकांची कसरत, रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 14:03 IST

Aurangabad Pothole पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून​ येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होत आहे.

ठळक मुद्देमागील सहा महिन्यांपासून तब्बल दीड किमीच्या मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहेतखड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत

-  श्रीकांत पोफळे

करमाड : मराठवाड्यासह महाराष्ट्रातं यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली, पावसाचे​प्रमाण यावर्षी ​जास्त असल्याने मुख्य महामार्गासह गावखेड्यातील रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. औरंगाबाद-जालना या मुख्य​महामार्गावरही​ राजमाता जिजाऊ चौक कॅंब्रिज स्कूल ते चिकलठाणापर्यंत गेल्या सहा महिन्यापासून​ खड्डेचखड्डे पडल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. सलग ६ महिने रस्ता खराब असल्याची 10 वर्षांत पहिलीच वेळ असल्याची रोज प्रवास करणारे त्रस्त प्रवासी सांगत आहे. प्रवासी आणि रुग्णांना याचा त्रास होत असूनही संबंधित विभागाचे अधिकारी सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मराठवाडा, विदर्भातून​ येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करतात खड्ड्यांच्या रांगोळीने स्वागत होतं आहे. महामार्गावर​ मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची​मोठी दुरवस्था झाली आहे. कॅंब्रिज शाळा ते चिकलठाणा​ हा रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता शहरात येणारा​मुख्य रस्ता व​ महामार्ग असूनही याच्या दुरुस्तीकडे​संबंधित विभागाचे​दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. यामुळे जिव मुठीत धरून दोन तीन किलोमीटर अंतर पार करावे लागत असून अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागतं आहे. काही दिवसांपूर्वीचं खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एका बाईकस्वाराचा अपघात होऊन जीव गमवावा लागला होता. प्रवासी, रुग्ण आणि वाहनचालक त्रस्त असूनही या मार्गाच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग गेल्या सहा महिन्यापासून झोपेचं सोंग घेत गप्प असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे .

जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे. खड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. वयस्कर मंडळींना मणक्याचे त्रास उद्भवत आहेत. संबंधित विभागाने थोडी शरम वाटू द्यावी व तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी. - रवी शिरसाठ, रहिवासी, सुंदरवाडी.

अपघाताच्या भीतीने कमी वेगात गाडी चालवावी लागते. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनकोंडी होत आहे. यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.- बद्री शिंदे, हॉटेल चालक, झाल्टा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPotholeखड्डे