शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray in Aurangabad: अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 18:49 IST

Raj Thackeray in Aurangabad: काल(दि.29) राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेदेखील औरंगाबादमध्ये रस्ता चुकल्याची घटना घडली होती.

औरंगाबाद:मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे औरंगाबादेत सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान आगमन झाले. मनसैनिकांनी ढोल ताश्यांच्या गरजात राज यांचे जंगी स्वागत केले. शहरात आल्यानंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला. दरम्यान, अमित ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरेदेखील रस्ता चुकल्याची घटना यावेळी घडली.

अमित ठाकरेही रस्ता चुकलेमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभा आहे. सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेत्यांसोबत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) काल(दि.29) औरंगाबादेत दाखल झाले. शहरात आल्यानंतर त्यांचे बाबा पेट्रोल पंप परिसरात स्वागत होणार होते, पण गुगल मॅपमुळे रस्ता चुकले आणि थेट हॉटेलच्या दिशेने गेले. त्यानंतर आज राज ठाकरेही रस्ता चुकल्याची घटना घडली.

ट्रॅफिकमध्ये अडकली राज यांची गाडीराज ठाकरेंचा ताफा बाबा पेट्रोल पंपावरुन क्रांती चौकात दाखल झाला. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन तिथून सरळ पुढे हॉटेल रामा मध्ये जायचे होते. मात्र, क्रांती चौकातून राज यांची गाडी परत बाबा पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाली आणि त्यांचा ताफा हॉटेलच्या दिशेने गेला. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर राज ठाकरेंची गाडी चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या बाजूने एसएससी बोर्डाकडे गेली आणि तेथून परत क्रांती चौकात आली. ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांना समजल्यावर ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी मनसैनिकांनाच रस्त्यावर उतरावे लागले. मात्र रस्ता चुकल्याने राज ठाकरे यांना ट्राफिकचा सामना करावा लागलाच. काही वेळानंतर त्यांची गाडी ट्रॅफिकमधून हॉटेलच्या दिशेने निघाली.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबाद