शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

‘राज’दरबार सुनासुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:08 AM

खचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले.

सुधीर महाजनखचाखच भरलेल्या जाहीर सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपचे वस्त्रहरण करणाऱ्या राज ठाकरेंना आज औरंगाबादेत रिकाम्या खुर्च्यांना सामोरे जावे लागले आणि गर्दीची सवय असल्याने अक्षरश: वैतागून त्यांनी दीड मिनिटात व्यासपीठ सोडले. मनसेच्या औरंगाबादमधील पहिल्यावहिल्या शिक्षक मेळाव्याने राज ठाकरेंच्या उत्साहावर पाणी ओतले. राज ठाकरे औरंगाबादेत चार दिवसांच्या दौºयावर आले होते; पण त्यांनी दोन दिवसांतच तो आवरता घेतला आणि आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाणी पाजण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले.काल कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि चर्चेनंतर आज मेळावा आयोजित केला होता आणि १५/२० हजारांची गर्दी जमवण्याचा प्रयत्न होता; पण दीड दोनशे लोकांची उपस्थिती पाहून राज ठाकरे निघून गेले. राज ठाकरे पुन्हा एकदा भगवा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाचा जागर करीत मैदानात उतरले आहेत. रा. स्व. संघ, भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदुत्वाने व्यापलेल्या या मैदानात तशी राज यांच्यासाठी फारशी जागा नाही, तरी अंग चोरत त्यांनी तेथे घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सेनेकडून रिकामी होणारी जागा अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संगतीने संसार मांडलेल्या सेनेचे हिंदुत्व पातळ झाले असा हिंदुत्ववाद्यांबरोबर राज यांचाही समज झालेला दिसतो, म्हणून आज आपला झेंडा बदलून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जयघोष करीत ते इकडे वळले, ते भाजपच्या वळचणीला जाण्यासाठी.या पार्श्वभूमीवर सेनेला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी औरंगाबाद निवडले, कारण येथे महानगरपालिका निवडणूक तोंडावर आहे. गेल्या ३० वर्षांपासून सेनेचे वर्चस्व या शहरावर आहे; परंतु नागरी सुविधांच्या अभावामुळे जनता त्रस्त झाली असून, ती हिंदुत्वाला पर्याय म्हणून भाजपला जवळ करील असे गणित मांडले जाते आणि याच समीकरणाच्या आधारावर सेनेच्या विरोधात भाजपचा हात धरून राज यांच्या मनसेला येथे उतरायचे आहे. यासाठी औरंगाबाद त्यांना ‘फर्टाईल ग्राऊंड’ दिसते. शिवसेनेविरुद्धच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या हिंदुत्वाचे पीक येथे बहरू शकते, असा त्यांचा होरा दिसतो. म्हणूनच त्यांचा चार दिवसांच्या भरगच्च दौºयाचा कार्यक्रम घेऊन ते औरंगाबादेत डेरेदाखल झाले; पण कसाबसा दोन दिवस दम धरून मुंबईला परतले. दौरा आकसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.या दोन दिवसांच्या दौºयाने काय साधले याचाही हिशेब मांडला पाहिजेच. राज यांचे स्वागत उत्साहात झाले. गर्दी जमली, दुसºया दिवशी कार्यकर्त्यांशी चर्चा, मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम होता; पण तो पाऊणतासातच गुंडाळला गेला. पत्रकारांशी झालेल्या संवादातही मनसेच्या ठोस कार्यक्रमाचा आणि धोरणाचा उलगडा झाला नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नारांजांचा ओघ मनसेकडे येईल हा त्यांचा अंदाजही सपशेल कोसळला. सेनेच्या एकाही दिग्गजाला ते आपल्या तंबूत आणू शकले नाहीत आणि दुसºया दिवशी त्यांच्या मुक्कामस्थळी फारशी गर्दीही नव्हती. एकूणच इथले वातावरण त्यांना रुजणारे, मानवणारे नव्हते. जाताना त्यांनी ‘औरंगाबाद-संभाजीनगर या शिळ्या कढीलाच ऊत आणला. आता हे इतके गुळगुळीत झाले की, हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या गळाला तीन कार्यकर्ते लागले. त्यात शिवसेनेचे एकेकाळचे शहर प्रमुख सुहास दाशरथे हे एकच नाव महत्त्वाचे दिसते. दुसरे प्रकाश महाजन आणि तिसरे हर्षवर्धन जाधव. जे की, मनसेचे पहिले आमदार होते. पुढे ते शिवसेनेत गेले. सेनेतून बाहेर पडत स्वत:चा पक्ष काढला. लोकसभा आणि विधानसभेत पराभूत होत पुन्हा मनसेच्या वाटेवर आले. पक्ष संघटना बांधण्यासाठी यापैकी दाशरथेंचीच उपयुक्तता दिसते. एक तर शिवसेनेच्या पहिल्या फळीतील आणि संघटनेचा आधार असलेले ते कार्यकर्ते आहेत. सेनेतून इकडे नव्या पक्षात तेच काय कार्यकर्त्यांना वळवू शकतात. प्रकाश महाजनांकडे ते कौशल्य नाही आणि हर्षवर्धन यांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्न आहे. अशा तोकड्या फौजफाट्यावर राज ठाकरेंचा येथे शिवसेनेला शह देण्याचा इरादा आहे. शहरात, जिल्ह्यात पक्ष संघटना नाही, कार्यकर्ते नाहीत आणि आश्रयदाताही नाही, अशी परिस्थिती आहे.राज ठाकरे चार दिवस थांबतील, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील, इकडे येण्याचा विचार करणाऱ्यांना आशादायक वातावरणाचा दिलासा देतील, असा अनेकांचा होरा होता; पण ते दोन दिवसातच निघून गेल्यामुळे ‘मनसे’चे वातावरणच तयार झाले नाही. सेनेच्या कारभाराला नागरिक कंटाळले असा एक शिवसेनाविरोधी सूर भाजप व तत्सम पक्षांकडून आळवला जातो. तसे सध्या तरी दिसत नाही. उलटपक्षी गजानन बारवाल यांच्यासारखी सेनेतून भाजपमध्ये गेलेली मंडळी परतीच्या वाटेवर आहेत. त्यात किशनचंद तनवानींचेही नाव घेतले जाते. शहराची नाडी ओळखणारे हे राजकारणी आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या हालचाली वेगळेच काही दर्शवितात. अशा पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा मुख्य गाभा समाज परिवर्तनाचा असतो. या कीर्तनाला अलोट गर्दी उलटते, म्हणजे समाज परिवर्तन झाले असे जसे म्हणता येणार नाही, तद्वतच राज ठाकरेंचे आहे. त्यांच्या भाषणात गर्दी खेचण्याची ताकद आहे; पण ‘मनसे’ बाळसे धरत नाही, म्हणूनच संघ, भाजप, शिवसेनेच्या ‘हिंदुत्वाचा चौथा कोन’ मनसे कशी बनणार, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाRaj Thackerayराज ठाकरे