शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या वाळूज महानगराला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:04 IST

वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाने अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. जवळपास अर्धा ते पाऊणतास झालेल्या जोरदार पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाºयाने औद्योगिक क्षेत्रासह अनेक नागरी वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह पाऊस : कामगार- व्यावसायिकांची तारांबळ, वीजपुरवठा खंडित

वाळूज महानगर : वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाने अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. जवळपास अर्धा ते पाऊणतास झालेल्या जोरदार पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाºयाने औद्योगिक क्षेत्रासह अनेक नागरी वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला.गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी कडक ऊन पडल्याने उकाडा वाढला होता. मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. सायंकाळी साडेचार वाजता वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पंढरपूर, वळदगाव, सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, तीसगाव, वडगाव, रांजणगाव आदी भागांत जवळपास अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस झाला. तर वाळूज, जोगेश्वरी, पाटोदा, लांझी आदी भागांत हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरी वसाहतीतील रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिक, प्रवासी व दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. कामाहून सुटलेल्या कामगारांना भिजतच घरी जावे लागले. मोहटादेवी भाजीमंडईत पाणी साचून चिखल झाल्याने व्यावसायिकांना रस्त्यावर बसावे लागले. पंढरपुरातील तिरंगा चौकात झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली. मात्र तेव्हा रस्त्यावर कोणीही नसल्याने हानी टळली. फांदीमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अखेर वाहनधारकांनी रस्त्यावरील फांदी उचलून बाजूला करून रस्ता मोकळा केला.रांजणगावात भिंत पडली....रांजणगाव येथील किशोर सांडू सुरडकर यांच्या घराच्या तिसºया मजल्याचे बांधकाम सुरू आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून शेजारील शंकर संपत गायकवाड यांच्या घरावर पडली. मलब्यामुळे गायकवाड यांच्या घराचे छत व पत्रे कोसळून खाली पडले. यात घरातील पलंग, कूलर, टीव्ही, पंखा, शेगडी व इतर संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तलाठी राहुल वंजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यात जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले.औद्योगिक क्षेत्रासह निवासी भागातील वीजपुरवठा खंडितवाळूज महानगराला वीजपुरवठा करणाºया पडेगाव येथील १३२ के.व्ही. सबस्टेशनमध्ये ब्रेक डाऊन झाल्यामुळे उद्योगनगरीसह अनेक नागरी वसाहतीतील वीजपुरवठा सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बंद पडला होता. त्यामुळे उद्योगनगरीतील कारखान्याचे कामकाज ठप्प पडले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तासाभराच्या अंतराने टप्प्याटप्प्याने उद्योगनगरीतील विविध सेक्टरमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू केल्याचे कार्यकारी अभियंता राजेश भगत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. उद्योगनगरीतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, राहुल मोगले, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने, अनिल पाटील, अर्जुन गायकवाड आदींनी नाराजी व्यक्त करून वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस