शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राची हजेरी; वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज कोसळून तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 19:38 IST

जोरदार वाऱ्यासोबत वीजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात मृग नक्षत्राने हजेरी लावली.

औरंगाबाद: शहरात आणि जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचे विजांच्या गडगडाटासह जोरदार आगमन झाले. दरम्यान, पैठण येथे दोन तर सिल्लोड येथे एक असा तिघांचा वीज कोसळून मृत्यू झाला. 

सायंकाळी पैठण शहरात जोरदार वाऱ्यासोबत वीजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात मृग नक्षत्राने हजेरी लावली. मृगाचा पाऊस शेतजमीनीसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पैठण विहामांडवा, नवगाव, टाकळी, पिंपळवाडी, आवडे उंचेगाव, पाचो परिसर, आडूळ रजापूर असा सर्वदूर पावसाने शनिवारी दुपारनंतर हजेरी लावली. केकत जळगाव येथे शेतात काम करत असताना जवळच वीज कोसळल्याने शेतकरी गजानन दराडे (२७) यांचे ह्दय बंद पडून मृत्यू झाला तर आडगाव जावळे येथील सांडू शामराव नजन यांच्या  घरा लगत वीज कोसळल्याने सांडू नजन यांची बहीन सरूबाई शहादेव लांडे यांचा मृत्यू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दोन्ही घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार दत्ता निलावाड यांनी तलाठ्यास दिले आहेत. 

सिल्लोड तालुक्यात एकाचा मृत्यूसिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह शनिवारी दुपारी पाऊस झाला काही ठिकाणी चांगला जोरदार तर काही ठिकाणी रिपरिप हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, वादळी वारा जास्त होता. यामुळे अनेक घरे व वखारींचे  टिन पत्रे उडाली. तर तालुक्यातील सावखेडा बुद्रुक उटाडेवाडीतील एका  शेतात वीज पडून शेतकरी  जागीच ठार झाला. पालोद येथे एक म्हैस वीज पडून मरण पावली. सावखेडा येथे वीज पडून मरण पावलेल्या शेतकऱ्यांचे नाव संजय नथु उटाडे वय ४५ वर्षे रा. उटाडेवाडी सावखेडा असे आहे.ते शेतात मशागतीचे काम करत असताना अचानक दुपारी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी