शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रेल्वे मुंबईपर्यंत गेल्याच नाहीत, शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरवरच फेरले ‘पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 18:26 IST

रेल्वे माघारी फिरल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थी मुंबईतील परीक्षा केंद्रांवर पोहोचूच शकले नाहीत.

ठळक मुद्देमुंबईतील पावसाने अनेक वर्षांचा अभ्यास वायारविवारी झाल्या ३ महत्वाच्या परीक्षा झाल्या  

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या, येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे अनेक रेल्वे मुंबईला न जाता अर्ध्या प्रवासातूनच परतल्या. पण त्या दिवशी मुंबईत ‘यूपीएससी’सह ३ परीक्षा होत्या.

रेल्वे माघारी फिरल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थी मुंबईतील परीक्षा केंद्रांवर पोहोचूच शकले नाहीत. या विद्यार्थ्यांच्या करिअरवरच पावसाचे पाणी फेरले गेले. मुंबईत १८ जुलै रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरूची महात्मा गांधी नॅशनल फेलोशिप, फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाची मॅनेजर पदांसाठी आणि ‘यूपीएससी’ची इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा पार पडली. त्या दिवशी पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नगरसोल, नाशिक, मनमाड, लासलगाव, इगतपुरी येथे रोखण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. यामध्ये या तिन्ही परीक्षा देण्यासाठी जाणारे परीक्षार्थीही होते. अनेक रेल्वे मुंबईला पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे आयआयएम बंगळुरूची एमजीएनएफ, यूपीएससीची ‘ईएसई’ आणि ‘एफसीआय’चे परीक्षार्थी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे उमेदवारांना परीक्षेविना राहावे लागले.

शासनाने न्याय द्यावादेवगिरी एक्स्प्रेस लासलगाव येथूनच माघारी परतली. या रेल्वेत माझ्यासह ३५ परीक्षार्थी होते. मुंबईतील विशेषत: केंद्राच्या परिसरात राहणाऱ्यांनाच परीक्षा देता आली. वर्षानुवर्षे अभ्यास केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. शासनाने भवितव्याशी न खेळता एक संधी देऊन सर्व विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे.- विशाल बंसवाल, परीक्षार्थी

पुन्हा संधी मिळावीनैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा देण्यापासून वंचित राहिलो. यात आम्हां विद्यार्थ्यांची काहीही चूक नाही. जर परीक्षेचे केंद्र पूर्ण राज्यभर असते, तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार केंद्राची निवड केली असती आणि आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास झाला नसता. संबंधित विभागाने अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी.- तुकाराम राजारूपे, एफसीआय परीक्षार्थी

टॅग्स :railwayरेल्वेexamपरीक्षाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद