शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भरली ‘जीएम’च्या दौऱ्याची धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 19:14 IST

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याची रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.

ठळक मुद्देअस्वच्छतेविषयी नाराजीप्रवाशांनीही जागरूक व्हावे

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याची रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. दौऱ्यात कोणत्याही त्रुटी निघणार नाहीत, यासाठी ‘दमरे’च्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी सोमवारी रेल्वेस्टेशनवर पाहणी करून विविध सूचना केल्या.

‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर विविध कामांचा धडाका सध्या सुरूआहे. याची पाहणी करण्यासाठी त्रिकालज्ञ राभा सोमवारी दुपारी दीड वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले. ेस्टेशनच्या नव्या इमारतीचे रंगकाम, फरशांची कामे, स्वच्छतागृहातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना कामासंदर्भात विविध सूचना करीत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे त्यांनी बजावले.

स्टेशन परिसराची पाहणी करताना राभा यांनी अस्वच्छतेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, पोलीस निरीक्षक दिलीप साबळे आदी उपस्थित होते.  याप्रसंगी रेल्वेत सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आॅल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनने  निवेदनाद्वारे राभा यांच्याकडे केली.

दुसऱ्या टप्प्यासाठी प्रयत्नशीलच्रेल्वे प्रशासनातर्फे औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा विकास करण्यास प्राधान्य आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक येतात. स्टेशनविषयी कौतुक करतात; परंतु अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करतात. रेल्वे प्रशासन स्वच्छतेची जबाबदारी निभावते. मात्र, प्रवाशांनीही स्वच्छतेला प्राधान्य दिले, तर रेल्वेस्टेशनचा विकास सार्थक होईल. रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी प्रयत्नशील असून डिझाईन अंतिम केले जात आहे, असे  त्रिकालज्ञ राभा म्हणाले.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीAurangabadऔरंगाबाद