शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लासूर ते पोटूळदरम्यान रेल्वे रुळाचा जोड निखळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:16 IST

औरंगाबाद : लासूर ते पोटूळ रेल्वेस्टेशनदरम्यान रेल्वे रुळाचा जोड (वेल्डिंग) निखळल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर सहा ...

ठळक मुद्देवेळीच सतर्कता : रेल्वे धावल्या धीम्या गतीने

औरंगाबाद : लासूर ते पोटूळ रेल्वेस्टेशनदरम्यानरेल्वे रुळाचा जोड (वेल्डिंग) निखळल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर सहा रेल्वेगाड्या अगदी धीम्या गतीने रवाना करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने एखादी दुर्घटना होण्याचे टळले.रेल्वे मार्गात दोन रूळ जोडण्यासाठी वेल्डिंग केली. वेल्डिंग केलेल्या जागेवर ‘नटबोल्ट’द्वारे क्लिपदेखील बसविण्यात येते. थंडीमुळे अनेकदा रेल्वे रुळाला तडा जाण्याचा आणि वेल्ंिडग निखळण्याचा प्रकार होतो. लासूर ते पोटूळदरम्यान रेल्वे रुळाचा जोड निखळल्याची घटना घडली. औरंगाबादहून जनशताब्दी एक्स्प्रेस रवाना झाली. ही रेल्वे लासूर ते पोटूळदरम्यान असताना रेल्वे रुळाची वेल्ंिडग निखळल्याचा प्रकार रेल्वेच्या गार्डच्या लक्षात आला. याविषयी तात्काळ लासूर स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. गँगमन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुळाची दुरुस्ती होईपर्यंत रेल्वेगाड्या अतिशय संथ गतीने या ठिकाणाहून रवाना करण्यात आल्या.असा प्रकार अनेकदा होतो. रुळाच्या जोडवर क्लिप असते. त्यामुळे हा प्रकार धोकादायक नसतो. संबंधित ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे दोन दिवसांपासून प्रवाशांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच ही घटना घडली आणि पुन्हा काही रेल्वेगाड्यांची गती मंदावली.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात