शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या ITRवर देशभरात १५० ठिकाणी धाडी; धागेदोरे छत्रपती संभाजीनगरातील एका CA फर्मपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:56 IST

आयकर विभागाने एआयच्या मदतीने संशयास्पद व्यवहार शोधले; छत्रपती संभाजीनगरातील सीए फर्म पुन्हा अडचणीत!

छत्रपती संभाजीनगर : आयकर विवरणपत्रात (ITR) खोटी वजावट आणि करसवलती दाखवून परतावा मिळवणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर आयकर विभागाने सोमवारी मोठी कारवाई सुरू केली. देशभरात १५० ठिकाणी पडताळणी मोहीम राबविण्यात आली. त्याचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहेत. येथील एका सीए फर्मच्या कार्यालयासह कनिष्ठ कॉमर्स महाविद्यालयात दिवसभर कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.

बनावट हक्क, खोटी माहिती आणि दलालांच्या मदतीने उभारलेली रिफंड रॅकेट्स देशभरात उघडकीस आली आहेत. आयकर विभागाने मागील काही महिन्यांत मिळालेल्या डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि ग्राउंड इंटेलिजन्सच्या आधारे संशयास्पद व्यवहार ओळखून ही कारवाई केली. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशात एकूण १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये करचुकवेगिरी करून शासनाला चुना लावण्यात आल्याचे मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळाल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरात पहाटेपासून कारवाई, पंजाब, मुंबई, नाशिकहून आले अधिकारीछत्रपती संभाजीनगरातील एका सीए फर्मवर सोमवारी पहाटेपासूनच कारवाईला सुरुवात झाली. यासाठी पंजाब, मुंबई आणि नाशिकहून आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी रविवारी मध्यरात्री शहरात दाखल झाले होते. स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेत पहाटे ५:३० वाजता सिडको एन-२ ठाकरेनगर येथील क्लासेस, संबंधित सीएचे निवासस्थान, सिडको एन-४ येथील ज्युनिअर कॉमर्स कॉलेज आणि हर्सूल टी-पॉइंट येथील कार्यालय अशा तिन्ही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. ही कारवाई पूर्णतः गोपनीय ठेवण्यात आली होती आणि ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. उल्लेखनीय म्हणजे, याच सीए फर्मवर २०१५ मध्येही आयकर विभागाने अशाच स्वरूपाची कारवाई केली होती.

बनावट दाव्यांवर कठोर कारवाईचा इशाराआयकर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे की, वजावट व परतावा मिळविण्यासाठी खोटे दावे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यामध्ये आर्थिक दंड, गुन्हे नोंदविणे आणि मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येईल.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर