शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड पंचायत समितीच्या सभापती पदावर रायभान जाधव विकास आघाडीचे घुगे; उपसभापतीपद भाजपकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 16:01 IST

१० विरुद्ध ६ मतांनी झाला विजय

कन्नड - पंचायत समितीच्या सभापतीपदी रायभान जाधव विकास आघाडीचे आप्पाराव घुगे तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. नयना तायडे यांची निवड झाली.

सभापतीपदासाठी काँग्रेसच्या रुबिना कुरेशी यांनी तर आघाडीचे आप्पाराव घुगे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. उपसभापती पदासाठी भाजपच्या डॉक्टर नयना तायडे व शिवसेनेच्या मुन्नी पवार यांनी अर्ज दाखल केले होते. मतदाना अंती सभापतीपदासाठीचे उमेदवार आप्पाराव घुगे यांना व उपसभापती पदाच्या उमेदवार डॉ. नयना तायडे यांना प्रत्येकी १० तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सभापती पदाच्या उमेदवार रुबिनाबी कुरेशी व उपसभापती पदाच्या उमेदवार मुन्नी पवार यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते तर सहाय्यक म्हणून तहसीलदार संजय वारकड आणि गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी काम पाहिले.

निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, चिटणीस डॉ. संजय गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार,  खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस, संचालक मेहेगावचे सरपंच पांडुरंग घुगे, राजेंद्र गव्हाणे, रमेश नागरे, मनोज देशमुख, अजबसिंग राजपूत, भगवान कोल्हे आदींनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव